Chandrapur Voting Center Revision memorandum submitted by BJP leaders

चंद्रपुरात बूथ पुनर्रचना त्रुटी; भाजपचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 4, 2026

चंद्रपूर –  Chandrapur Voting Center Revision मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरातील मतदान केंद्र व बूथ पुनर्रचनेत मोठ्या त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर ही कारवाई करण्यात आली. अनेक भागांतील मतदारांना त्यांच्या परिसरापासून दूर मतदान केंद्रे देण्यात आली आहेत. यामुळे मतदानाच्या दिवशी नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (हे हि वाचा – जिल्हाधिकारी पंत यांचा नागभीड दौरा)

    यावेळी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रविंद्र गुरनुले, उपाध्यक्ष बलराम डोडाणी, बीएलओ वन सुमित बेले, प्रलय मशाखेत्री, इश्वर वाघमारे, आदिंची उपस्थिती होती.

मतदारांच्या वास्तव्यापासून दूर असलेल्या मतदान केंद्रांवर भाजपचा आक्षेप

      निवेदनात विविध भागांतील मतदारांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या परिसरापासून दूर मतदान केंद्रे देण्यात आल्यामुळे मतदानाच्या दिवशी अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे मतदारांच्या सोयीचा विचार करून मतदान केंद्रे व बूथचे पुनर्नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.

 शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, हनुमान नगर, गणेश नगर, रामकृष्ण टॉकीज परिसर व बेलोरा येथील काही मतदारांना सध्या जनता शाळा, सिव्हिल लाईन येथील मतदान केंद्र देण्यात आले असून, त्याऐवजी जवळील डॉन बॉस्को शाळा, पोलीस कल्याण सभागृह किंवा संकल्प याचिका कार्यालय येथे मतदान केंद्र निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

 तसेच सराई वॉर्ड व जवळपुरा परिसरातील मतदारांसाठी पोलीस कल्याण सभागृहाऐवजी जनता शाळा, सिव्हिल लाईन येथे मतदान केंद्र निश्चित करावे, अशीही मागणी करण्यात आली.

  याशिवाय रायपुरा नगर, धंगड नगर व तुळशी नगर येथील मतदार सध्या वेगवेगळ्या बूथमध्ये विभागले गेले असल्याने त्या परिसरासाठी स्वतंत्र मतदान केंद्र किंवा बूथ निर्माण करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

            सदर प्रक्रियेदरम्यान एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या बूथमध्ये गेल्यामुळे भविष्यात ठस्व् यांच्याशी संपर्क, निवडणूक व्यवस्थापन तसेच मतदानासाठी नागरिकांना अनावश्यक गैरसोय होणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे शक्य त्या ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच बूथवर समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदारांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने करण्याच्या सूचना दिल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. यावर निवडणूक प्रशासनाने सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment