Free Driving Training Chandrapur initiative by Utkrusht Mahila Manch

चंद्रपुरात महिला व पुरुषांना मिळणारे मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 5, 2026

चंद्रपूर – Free Driving Training Chandrapur या उपक्रमाचा शुभारंभ उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थेच्या “नवी उमेद, नवी झेप” अंतर्गत ३ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आला. चंद्रपुरातील महिला व पुरुषांना स्वावलंबी बनवणे हा या मोफत प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी संस्थेने मोफत शिवणकाम, संगणक आणि ब्युटी पार्लरचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या सर्व कौशल्याधारित उपक्रमांना नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात राजधानी एक्सप्रेसला थांबा मिळणार?)

या उपक्रमाअंतर्गत यापूर्वी मोफत शिवणकाम, संगणक प्रशिक्षण तसेच ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या बॅचेस सुरू करण्यात आल्या असून, या प्रशिक्षणांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

याच उपक्रमाची पुढील पायरी म्हणून दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी महिला व पुरुषांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षणाला शुभारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण पूर्णपणे निःशुल्क असून, अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमासाठी उत्कृष्ट महिला मंचाच्या अध्यक्षा सौ. छबूताई वैरागडे, सचिव सौ. साक्षी कार्लेकर तसेच कार्यकारिणी समिती सदस्य सौ. सोनाली धनमने, सौ. मेघा अंदनकर, मनीषा भाके,स्नेहल बांगडे अर्चना चहारे, पूजा पडोळे, प्रिया खनके, करिना, योगिता धनेवार,सारिका बोराडे,माया खनके,शितल कावडे, वसू बोडखे, परेश, सुवर्णा बेज्जलवार स्नेहा पोटदुखे, वर्षा खामणकर,स्नेहल शर्मा, पूनम पोटदुखे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

उत्कृष्ट महिला मंचाच्या माध्यमातून महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाला कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, स्वावलंबनाला चालना देणे आणि सशक्त समाजाची निर्मिती करणे, हा संस्थेचा ध्यास असून, भविष्यातही अशाच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपुरात महिला व पुरुषांना मिळणारे मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण”

Leave a Comment