चंद्रपूर : chandrapur rajdhani express stop बाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर बंगळुरू – हझरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचा थांबा मंजूर व्हावा, यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर पाठपुरावा करत आहेत.
त्यांच्या मागणीची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने दखल घेतली आहे. रेल्वेमंत्र्यांनी या विषयावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र खासदार धानोरकर यांना प्राप्त झाले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी १७ जुलै २०२६ आणि १८ जुलै २०२६ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून चंद्रपूर आणि परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी राजधानी एक्सप्रेसला चंद्रपूर स्थानकावर थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती. चंद्रपूर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक व व्यावसायिक केंद्र असल्याने येथे राजधानी एक्सप्रेसला थांबा मिळणे अत्यंत गरजेचे आहे, ही बाब त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. (हे हि वाचा – चंद्रपुरात नगरसेवकाचे आमरण उपोषण)
या पत्राची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २९ जुलै २०२६ रोजी खासदार धानोरकर यांना दिलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट केले आहे की, खासदार महोदयांनी उपस्थित केलेल्या चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील राजधानी एक्सप्रेसच्या थांब्याबाबत आणि इतर संबंधित विषयांची चौकशी सुरू करण्यात आली असून तपासणीनंतर योग्य ती आवश्यक कारवाई केली जाईल.
चंद्रपूरच्या नागरिकांसाठी आणि रेल्वे प्रवाशांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






