Medical Store Strike पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची तयारी दर्शवणारे प्रतीकात्मक दृश्य.

Medical Store Strike । 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा भारत बंद; चंद्रपुरात उपाययोजना

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 18, 2026

Medical Store Strike : चंद्रपूर : ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या 20 मे रोजी ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने, संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. (व्यसनमुक्ती केंद्रात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू)

चंद्रपूर जिल्ह्यात Medical Store Strike दरम्यान सुरू राहणाऱ्या औषध दुकानांची माहिती

संपाच्या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तालुकानिहाय काही औषधी दुकाने सुरू राहतील, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी खालील व्यक्तिंशी संपर्क करावा. Medical Store Strike

चंद्रपूर : बंटी घाटे (मो. 9604789005), जितेंद्र राजा (मो. 9850378781), प्रशांत जाजू (मो. 9422136075), आकाश येरगुडे (मो. 9021974393), सुमीत बावणे (मो. 9420659964), विनय सबनीस (मो. 9422837633). घुग्घुस : गंधर्व भगत (मो. 9922517194), बल्लारपूर : निशीकांत खैरे (मो. 9422139388), राजुरा : कैलास रेंगुटवार (मो. 9270122185), कोरपना : लक्ष्मीकांत देवतडे (मो. 9545667783), जिवती : मोहमद देशमुख (मो. 9881013685), पोंभुर्णा : विजयपाल पिपरे (मो. 7875676215), गोंडपिपरी : रविंद्र सोनुले (मो. 9421718752), भद्रावती : अविनाश पारोदे (मो. 9850738755), वरोरा : मनिष पिंपळशेंडे (मो. 9420304403), चिमूर : अजय चौधरी (मो. 9421721256), मूल : मनिष येलट्टीवार (मो. 9326109977), सिंदेवाही : राजेंद्र पशीने (मो. 9423608223), सावली : गजानन टोंगे (मो. 9422191804), नागभीड : विजय बोरकर (मो. 9423638561), ब्रम्हपुरी : सुरेश अटवार (मो. 9423642205). Medical Store Strike

आणिबाणीच्या प्रसंगी औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी तथा त्यांच्या नातेवाईकांनी सहायक आयुक्त (औषधे) सुहास सावंत (मो. 8600026385) आणि औषध निरीक्षक नालंदा उरकुडे (मो. 9096414104) यांच्याशी संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. सावतं यांनी कळविले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment