मूल तालुक्यात सोन्याचे दागिने हिसकावले गेलेल्या रस्त्याची प्रातिनिधिक प्रतिमा

गावाचा पत्ता विचारला आणि दागिने हिसकावले; मूल पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 20, 2026

मूल – मूल तालुक्यात ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. ही घटना बोंडाळा खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. तक्रारीनुसार, उसेगाव (ता. सावली) येथील ६५ वर्षीय महिलेला दुचाकीवरील तिघांनी थांबवले. १५ ऑक्टोबरला सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांनी गावाचा पत्ता विचारला. त्यानंतर एकाने गळ्यातील गळसोळी आणि डोरला हिसकावला. प्रकृती बिघडल्याने महिलेने १९ ऑक्टोबरला मूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (७ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा, एलसीबी ने गाठलं, वाचा हि बातमी)

मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोंडाळा खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका वयोवृद्ध महिलेला गावाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून तिघे भामटे दुचाकीवरून फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

सोन्याचे दागिने हिसकावले : बोंडाळा खुर्द रस्त्यावर काय घडले?

उसेगाव (ता. सावली) येथील रहिवासी ६५ वर्षीय मुखराबाई देवाजी भोयर या आपल्या पतीसह १५ ऑक्टोबर रोजी वढोली येथून एसटी बसने बेंबाळ येथे पोहोचल्या. तेथून आपल्या मुलीला भेटण्यासाठी बोंडाळा खुर्दकडे दोन्ही पती-पत्नी पायी जात असताना, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बलकी देवाच्या समोरील विसाव्याजवळ मागून आलेल्या एका दुचाकीवरील तीन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. त्यापैकी डोक्यावर शेंडी असलेल्या अंदाजे २० ते २५ वर्षे वयाच्या एका तरुणाने मुखराबाई यांना समोरील गावाचे नाव विचारले. मुखराबाई यांनी उत्तर देताच, काही समजण्याच्या आत आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची गळसोळी आणि सोन्याचा डोरला असा सुमारे दीड ग्रॅम वजनाचा व ७,५०० रुपये मूल्याचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला.

घडलेल्या अचानक घटनेमुळे घाबरलेल्या वृद्धापकाळातील मुखराबाई यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तातडीने तक्रार न नोंदवता मुलीच्या घरी विश्रांती घेतली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी १९ ऑक्टोबर रोजी मूल पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत तोंडी तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे मूल पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक सुरेश शंकर कन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment