नान्होरी येथील कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शिवानी वडेट्टीवार. नान्होरी रक्तदान शिबिर

नान्होरी येथे रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शिवानी वडेट्टीवार यांची उपस्थिती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 16, 2026

ब्रम्हपुरी – ब्रम्हपुरी तालुक्यातील नान्होरी येथे नान्होरी रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. महान त्यागी बाबा जुमदेवजी बहुउद्देशीय सेवक संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार उपस्थित होत्या. सामाजिक उपक्रमांमधून माणुसकी आणि बंधुभाव दृढ होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. (महाराष्ट्र राज्य शेतकरी आयोग स्थापन करा – सुधीर मुनगंटीवार)

नान्होरी येथे कोणता कार्यक्रम झाला?, नान्होरी रक्तदान शिबिर

समाजात मानवता, सेवाभाव आणि सामाजिक एकतेची मूल्ये रुजविण्यासाठी लोकपयोगी, सामाजिक उपक्रमांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. रक्तदानातून एखाद्याला जीवनदान देण्याचे महान कार्य घडते, तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून नव्या पिढीला शिक्षण आणि प्रगतीची प्रेरणा मिळते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमधून समाजात माणुसकी, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपुरी तालुक्यातील नान्होरी येथे महान त्यागी बाबा जुमदेवजी बहुउद्देशीय सेवक संस्थेच्या वतीने आयोजित जनरल हवन कार्य, नवीन सभा मंडपाचा उद्घाटन सोहळा, रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, महान त्यागी बाबा जुमदेवजी बहुउद्देशीय सेवक संस्थेचे अध्यक्ष अनिल नवघडे, कोषाध्यक्ष मारुती नाकतोडे, सुषमा उईके, कपिल राऊत, अमोल पेशने, प्रभाकर शेंडे, शेखर तलमले, सुधाकर तलमले, प्रमोद बोरकुटे, नवजीवन जांभुळे, होमदेव चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शिवानी वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

यावेळी पुढे बोलतांना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, सत्य, मर्यादा, प्रेम आणि मानवतेचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने भेदभाव बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. रक्तदानासारख्या उपक्रमातून गरजू रुग्णांना नवजीवन मिळते, तर विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळते आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सेवक उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment