चंद्रपूर: लाखो रुपये वाचवा! अमृत योजनेतून ड्रोन पायलट प्रशिक्षण 100% मोफत

May 19, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर -  महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेखुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी अमृत संस्थेच्यावतीने ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. (वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू)

 

शेती क्षेत्रापासून फोटोग्राफीपर्यंत विविध क्षेत्रांतील कामे अचूक आणि उत्तम पद्धतीने करण्यासाठी आज ड्रोनचा वापर केला जातोड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतातमात्र अमृत योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण चक्क मोफत दिले जातेएवढेच नव्हेतर प्रशिक्षणानंतर ड्रोन उडवण्याचा अधिकृत परवानाही दिला जातो.

 

हे प्रशिक्षण अत्यंत दर्जेदार असून 10 दिवसांचा निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातोड्रोन ऑपरेटर (पायलटप्रशिक्षण कार्यक्रमामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेतड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असूनशेती फवारणीपीक सर्वेक्षणभूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीसरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातोत्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहेहे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केलीमहाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांनाविशेषतः ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणेहा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 

कोण करू शकतो अर्ज :   खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाहीअशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहेत्यामध्ये ब्राह्मणकायस्थकोमटी/वैश्यमारवाडीपटेलराजपूतयलमारअय्यंगारराजपुरोहितपाटीदारनायरनायडूकम्माकानबीसिंधीबनियाबंगालीत्यागीसेनगुनथरगुजराथीठाकूरजाटलोहानाहिंदू नेपाळी व भूमिहार अशा 25 जातींचा सद्यस्थितीत समावेश आहेअशा जातींमधील वार्षिक उत्पन्न लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

पात्रता : 1) उमेदवार हा वर दिलेल्या लक्ष्यित गटातील आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 2) त्याचे वय 18 ते 55वर्षांदरम्यान असावे. 3) उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.  5) शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला प्राधान्य दिलेजाईल.

येथे करा संपर्क : या योजनेविषयीची सविस्तर माहितीसाठी अमृत चंद्रपूर जिल्हा  कार्यालयकृष्णा टॉवर जवळगुरुद्वारा रोड तुकूमअधिक माहितीसाठी विक्रममोहन पांडे , मो. 9112228774 किंवा मेल आयडी amrut.chandrapurdm@gmail.com वर संपर्क करावाअसे जिल्हा व्यवस्थापक श्रीपांडे यांनी कळविले आहे.

Leave a Comment

+