चंद्रपूर - वर्ष २०१२ मध्ये राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे, वडगाव परिसरातील एकाने सुगंधित तंबाखू विक्रीकरिता साठवून ठेवला होता रामनगर पोलिसांनी छापेमारी करीत एकूण ५ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (भद्रावती शहरात १ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त)
रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंडावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गस्तीवर होते, यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि वडगाव मधील आंबेडकर सभागृहाजवळ राहणाऱ्या अजय कुमार या व्यक्तीने राहत्या घरी सुगंधित तंबाखूची साठवणूक विक्री करीता करून ठेवली आहे.
माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी छापामार कारवाई करीत आरोपी अजय कुमार यांच्या घरून पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू व सिगारेट असा एकूण ५ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत अजय कुमार ला ताब्यात घेतले. आरोपीवर कलम १२३, २२३, २७५ भारतीय न्याय संहिता सहकलम ३०(२) (a), २६ (२) (i), २६ (२), (iv), ५९ अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोउपनि कृष्णा दराडे, पोलीस कर्मचारी आनंद खरात, रामप्रसाद नैताम, प्रकाश बल्की, शरद कुडे, जितेंद्र आकरे, मनीषा, संदीप, प्रकाश मडावी, सुरेश कोरवार, रवीकुमार, प्रफुल्ल व पंकज पोंदे यांनी केली.
Leave a Comment