पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग! कत्तलखान्याकडे जाणारी १४ जनावरे वाचवली!

February 08, 2026 by Prakash Hande

Animal Cruelty Act : कोरपना (चंद्रपूर) - ७ फेब्रुवारीला गोपनीय माहितीच्या आधारे कोरपना पोलिसांनी १४ गोवंशीय जनावरांना जीवदान दिले, कत्तलीसाठी नेत असलेल्या वाहनाचा फिल्मी स्टाईल पाठलाग करीत पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करीत तब्बल ६ लक्ष ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (चंद्रपुरात अभियंत्याचे घर लुटले)

७ फेब्रुवारीला कोरपना पोलिसांना गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी वनसडी टोलनाका येथे नाकाबंदी केली त्यावेळी एका पिकअप वाहनाला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ते वाहन न थांबता भरधाव पुढे निघाले. पोलिसांनी त्या वाहनाचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला, पोलिसांच्या भीतीने आरोपीने सदर वाहन माथा फाटा रोडवर उभे करीत पळून गेले.

पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये १४ मग गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून होते, पोलिसांनी पिकअप क्रमांक टीएस ०७ युके ३८८१ ला जप्त करीत चालक व इतरांवर पशु संरक्षण अधिनियम व मोटार वाहन कायद्यांवये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी एकूण ६ लक्ष ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी राकेश वाकुलकर, रामदास आडे व लखन राठोड यांनी केली. 

Leave a Comment

+