BJP Sthapana Diwas : चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘संकल्प ते सिद्धी’ या भाजपच्या मूलमंत्राचा उलगडा करत कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपाचा वैभवशाली प्रवास झाल्याचे विचार मांडले. त्याचवेळी प्रत्येक कार्यकर्त्याने ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने कार्य करण्याचे भावनिक आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले. गांधी चौक येथे स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला चंद्रपुरातील विविध पक्षांमधील एकूण १६३० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांशी आ. श्री. मुनगंटीवार यांनी संवाद साधला आणि २०२७ मध्ये भाजपा स्थापना दिनानिमित्त दहा हजार कार्यकर्त्यांसोबत चांदा क्लब ग्राउंड येथे भव्य कार्यक्रम घेण्याचा कार्यकर्त्यांनी संकल्प करा असा निर्धारही यावेळी व्यक्त केला. (मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत १५६ नागरिकांचा भाजपात प्रवेश)
आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन केवळ एक औपचारिक उत्सव नसून कार्यकर्त्यांसाठी नव्या उर्जेचा आणि संकल्पाचा दिवस आहे. ‘राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः’ या विचाराने काम करण्याची गरज आहे.’ यावेळी त्यांनी भाजपाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून दिली. कार्यकर्त्यांचा त्याग, त्यांची निष्ठा आणि त्यांच्या परिश्रमामुळेच आज भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष बनल्याचा अभिमानही आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा” या अटलजींच्या मंत्रापासून ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवभारताच्या संकल्पापर्यंतचा प्रवास म्हणजे कार्यकर्त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या समर्पणाची गाथा आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विविध पक्षांमधून एकूण १६३० कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश करून त्यांचे दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू ,राजेंद्र गांधी, विजय राऊत, माजी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, प्रकाश धारणे, ब्रिजभूषण पाझारे, नम्रता ठेमस्कर, रवी लोणकर,जयश्री जुमडे, सुनीता जयस्वाल, सविता सरकार,सुरज पेदूवार,चांद सैय्यद, अनिल डोंगरे, विक्की लाडसे,छबुताई वैरागडे, धनराज कोवे आदींची यावेळी उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचे स्मरण करत, एकात्म मानववाद आणि अंत्योदयाच्या संकल्पनेवर आधारित पक्षाची वाटचाल झाली आहे. हा केवळ एक पक्ष नाही, तर एक परिवार आहे. पं. दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा विचार घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सेवा करावी.’ २०२७ पर्यंत चंद्रपूरात १० हजार सक्रिय कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारून पुढच्या वर्षी ६ एप्रिल २०२७ रोजी भव्य दिव्य भाजपा स्थापना दिनानिमित्त चांदा क्लब ग्राउंड येथे कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करूया असे आवाहन यावेळी केले. “ना कोई दर्द है, ना कोई आराम है, मेरी जिंदगी सिर्फ पार्टी और देश के नाम है” या भावनेने काम करत भाजपाचा विस्तार गावागावांत करण्याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले.
“संघटन मजबूत असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही,” असे सांगत त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला सक्षम, सजग आणि समाजाभिमुख बनवण्याचा संकल्प करावा, असे मार्गदर्शन केले. नव्या उर्जेने आणि नव्या दिशेने पक्षाला पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त करत, त्यांनी कार्यकर्त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे प्रेरणादायी संदेश आ.मुनगंटीवार यांनी दिला.
यावेळी आ. मुनगंटीवार यांनी आणीबाणीच्या काळातील संघर्षाची आठवण करून देत, लोकशाही रक्षणासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या कार्यकर्त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. “आज आपण ज्या उंचीवर उभे आहोत, त्यामागे हजारो ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचा त्याग आहे,” असे सांगत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील स्व. दादाजी देशकर, स्व. घागरगुंडेजी, स्व. अलमस्तजी, ताराचंद हिकरे यांसारख्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. “हा भगवा दुपट्टा केवळ वस्त्र नाही, तर त्यात अनेक बलिदानांची आणि राष्ट्रभक्तीची परंपरा दडलेली आहे,” असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अभिमान आणि प्रेरणेची ज्योत पेटवली. BJP Foundation Day 2026
तसेच, आगामी काळात भाजपाचा विस्तार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करत, समाजातील सर्व घटकांना जोडण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘गावातील शेतकरी, झोपडपट्टीतील गरिब, निराधार महिला, प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवणे हेच आपले अंतिम ध्येय आहे,’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचा मंत्र दिला. गांधी चौकातील हा उत्साह आणि एकजूट पुढील वर्षी चांदा क्लब मैदानावर १० हजार कार्यकर्त्यांसह अधिक भव्य स्वरूपात दिसेल, असा विश्वास व्यक्त करत सर्वांनी दूरध्वनीवरून संवादाची सुरुवात करताना हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे, असे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपुरातील १६३० अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला.
तुकम शास्त्रीनगर, एमईएल, बंगाली कॅम्प, विवेक नगर, इंडस्ट्रिअल इस्टेट, जटपुरा गेट, वडगाव, नगीनाबाग, एकोरी वॉर्ड, भानापेठ, बाबूपेठ, भिवापूर, डॉ.आंबेडकर नगर, पडोली,धानोरा पिपरी, मोरवा, पडोली अशा प्रभागातून मोठ्या संख्येने एकूण १६३० अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यासोबत अल्पसंख्यांक, ख्रिश्चन समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सर्वांचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत करत त्यांच्या खांद्यावर भाजपाचा दुपट्टा टाकत त्यांचे स्वागत केले.
Leave a Comment