चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर या भाजपच्या महापौर आहेत आणि भाजपचा महापौर व सर्व पदाधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करेल, त्यांना पदावरुन कोणी हटवू शकणार नाही, भाजप व सत्तेत मित्रपक्ष असलेल्या पक्षांचे नगरसेवक विकासाच्या बाजूने उभे असून महानगरपालिकेचा कार्यकाळ भाजप व मित्रपक्ष पूर्ण करेल असा विश्वास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नुकत्याच नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत व्यक्त करीत विरोधी नगरसेवक व कॉंग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्त्यव्याचा खरपूस समाचार घेतला. सदर बैठकीस भाजपचे जेष्ठ नेते विजय राऊत, खुषाल बोंडे, महापौर संगीता खांडेकर, प्रकाष देवतेळे, तुषार सोम, बलराम दोडाणी, सुभाश कासनगोट्टृवार, रवि गुरनुले, श्याम कनकम, सविता दंडारे, विनोद शेरकी, राजेंद्र अडपेवार, दशरथसिंग ठाकूर उपस्थित होते. (चंद्रपूर महापौरांना पदावरून हटवा - पप्पू देशमुख)
पदाधिकार्यांनी शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करीत महापौर यांच्या पाठीशी उभे राहत विरोधकांना उत्तर द्यावे असे आवाहन करीत सर्व नगरसेवकांनी विकासकामांवर भर द्यावा, पक्षाच्या हितासाठी काम करा, सर्व एक होवून पालिकेत काम करण्याच्या सुचना ही यावेळेस उपस्थित नगरसेवकांना हंसराज अहीर यांनी केल्या. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप सक्षमपणे काम करत असून विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. विरोधकांनी अषा प्रकारचे राजकारण करण्याऐवजी विधायक भुमिका घ्यावी असेही अहीर म्हणाले.
या बैठकीत दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, राजु घरोटे, विकास खटी, पुनम तिवारी, गौतम यादव, प्रदीप किरमे, सुदामा यादव, नगरसेवक अॅड. सारीका संदूरकर, भालचंद्र दानव, जितेष कुळमेथे, नितेष गवळी, सरला कुळसंगे, आशा देशमुख, अनुजा तायडे, पुश्पा उराडे, वंदना हातगांवकर, सुधीर कारंगल, विमल काटकर, सायली येरणे, कौसर खान, शशिकांत म्हस्के आदींची उपस्थिती होती.
Leave a Comment