चंद्रपूरचे डॉ. मंगेश गुलवाडे Maharashtra Medical Council Election मध्ये विजयी

May 02, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल (महाराष्ट्र वैद्यकीय परिषद) 2026 च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) एमएमसी (MMC) पॅनेलने अभूतपूर्व आणि दणदणीत विजय संपादन करत राज्यातील वैद्यकीय क्षेत्राचा एकमुखी विश्वास जिंकला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टरांनी दिलेल्या उत्स्फूर्त आणि भक्कम पाठिंब्यामुळे नऊ पैकी तब्बल आठ उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.
या विजयी उमेदवारांमध्ये डॉ. मंगेश गुलवाडे (चंद्रपूर), डॉ. संजय देशपांडे (नागपूर), डॉ. संतोष कदम (ठाणे), डॉ. संजय कदम (नांदेड), डॉ. सुनील इंगळे (पुणे), डॉ. अनिल पाचनेकर (मुंबई), डॉ. अनिल पाटील (जळगाव) आणि डॉ. निलेश निकम (नाशिक) यांचा समावेश आहे. (५ मे रोजी मुनगंटीवारांचा आरोग्य जनसंवाद)

 

या निवडणुकीतील यश हे केवळ निकाल नसून राज्यातील डॉक्टरांच्या एकजुटीचे, विश्वासाचे आणि सकारात्मक बदलाच्या अपेक्षांचे प्रतीक आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राच्या सर्व सदस्यांनी अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवत या विजयात मोलाचा वाटा उचलला.


या यशामागे आयएमए महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेतृत्वाचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि ठोस पाठबळ लाभले. विशेषतः डॉ. शिवकुमार उत्तरे (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल), डॉ. अशोक अढाव, माजी राष्ट्रीय अध्यक्ष IMA  डॉ. सुहास पिंगळे (माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र व माजी सदस्य  MMC), डॉ. मंगेश पाटे माजी सहसचिव  राष्टीय IMA तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र चे सर्व माजी अध्यक्ष, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. अरुण पावडे, डॉ. टी. सी. राठोड, डॉ. अशोक तांबे, डॉ. राम अरणकर, डॉ. विजय, डॉ. दिलीप सारडा, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. विजय पंजाबी, डॉ. होजी कपाडिया आणि डॉ. निसार शेख या सर्व मान्यवरांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.


नव्याने निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी, डॉक्टरांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि पारदर्शक, उत्तरदायी व प्रगतिशील प्रशासन उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दृढ विश्वास व्यक्त केला आहे.
हा विजय म्हणजे केवळ निवडणुकीतील यश नसून, महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्राच्या उज्ज्वल, सक्षम आणि एकजुटीच्या भविष्यासाठी दिलेला ठाम संदेश आहे.
महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये विजयी ठरलेल्या सर्व नवनियुक्त सदस्यांचे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूरतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.


IMA चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. प्रसाद पोटदुखे, सचिव डॉ. रुजुता मुंदडा, कोषाध्यक्ष डॉ. अभय राठोड, माजी अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित, तसेच डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. अशोक वासलवार, डॉ. किरण देशपांडे, डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. वासुदेव गाडेगोने , डॉ. विश्वास झाडे, डॉ. रवी आलुरवार, डॉ. सुनील संघाई , डॉ. अशोक भुकते, Dr प्रेरणा कोलते, डॉ. संजय घाटे,उपाध्यक्ष, IMA महाराष्ट्र डॉ. नागिना नायडू (सचिव, IMA महाराष्ट्र राज्य), डॉ. दीपक निलावर डॉ. कीर्ती साने, डॉ. विनय रत्नपारखी, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ.विलास मुळे, डॉ. अनिल मांडूरवार, डॉ. सचिन सरदेशपांडे, डॉ.नरेंद्र कोलते, डॉ. नसरीन मावणी, डॉ. प्रवीण पंत, डॉ.सुधीर रेगुडवार 
 डॉ.पियुष मुत्यालवार डॉ. हर्ष मामिडवार, डॉ. भुपेश भल्मे यांनी तसेच IMA चंद्रपूरच्या सर्व सदस्यांनी नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

+