Cattle Smuggling Chandrapur | धक्कादायक! चंद्रपुरात ३० गायी कत्तलीसाठी नेताना रंगेहाथ पकडले, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026 by Prakash Hande

Cattle Smuggling Chandrapur : चंद्रपूर - गोवंश तस्करी करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी २ आरोपीना अटक करण्यात आली आहे. (२० लाख दे नाहीतर गेम होणार, चंद्रपुरातील ठेकेदाराला धमकी)

 

२५ एप्रिल रोजी पहाटे १ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर मार्गे गोवंशाची कत्तलीकरिता तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांना मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली रोडवरील राहुल ढाब्यासमोर सापळा रचला, काही वेळाने एक आयशर ट्र्क क्रमांक MH ३४ Z ११५८ ला पोलिसांनी थांबवित झडती घेतली.

 

आयशर ट्र्क मध्ये १७ गायी, १३ बैल असे ३० गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबून ठेवले होते, गोवंश जनावरांचे हात-पाय आणि तोंड घट्ट दोरीने बांधलेले होते, चारा किंवा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती हे सर्व जनावरे कोरची जिल्हा गडचिरोली मार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेल्या जात होते.

 

पोलिसांनी यावेळी चालक ३८ वर्षीय निमामुद्दीन अमीनुद्दीन राहणार मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, मोहम्मद इरफान शेख हन्नान राहणार मूर्तिजापूर यांना अटक करण्यात आली असून यामधील एक आरोपी ज्याने ट्र्क मध्ये गोवंशाचा माल भरून दिला होता मोईन शेख राहणार गडचांदूर हा पसार झाला आहे. वाहन व गोवंश जनावरे असा एकूण २६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सुटका झालेल्या सर्व जनावरांना प्यार फाउंडेशन मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. 

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.      

 

 

Leave a Comment

+