Domestic Violence । दारूच्या नशेत हैवान बनला नवरा: काचेची बाटली डोक्यात बायको रक्तबंबाळ

April 25, 2026 by Prakash Hande

Domestic Violence Nagbhid : नागभीड (चंद्रपूर) - तुझे बाहेर कुणासोबत तरी सुरु आहे, असा संशय नवऱ्याच्या डोक्यात शिरल्याने त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला करीत डोक्यावर काचेची बाटली फोडली, या हल्ल्यात पत्नीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. (चंद्रपुरात भाईगिरी, नाश्ता सेंटरची तोडफोड)

 

जिल्ह्यातील नागभीड मध्ये अमित मडकाम हे पत्नी व मुलीसोबत राहतात, मडकाम यांना दारूचे व्यसन असल्याने ते नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण करीत असतात, सततच्या भांडणामुळे पत्नी हर्षा अमित मडकाम ह्या मागील १  महिन्यापासून चंद्रपुरात कामाला आहे. आठवड्यात सुट्टीच्या दिवशी त्या मुलीला भेटण्यासाठी नागभीड मध्ये जात असतात.

 

२४ एप्रिल रोजी हर्षा मुलीला भेटण्यासाठी नागभीडमध्ये आल्या होत्या, रात्री ८ वाजता अमित दारू पिऊन घरी आले, त्यावेळी काहीही न बोलता शोकेस मध्ये ठेवलेली काचेची बॉटल उचलत त्यांनी हर्षाच्या डोक्यावर मारली, या हल्ल्यात हर्षाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांनी तात्काळ दिराला बोलावीत नागभीड ग्रामीण रुग्णालयात नेले. 

याप्रकरणी हर्षा मडकाम ने नागभीड पोलीस स्टेशनमध्ये अमित मडकाम विरोधात तक्रार दिली, पोलिसांनी अमित मडकाम वर कलम ११८ (१) अन्व्ये गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

+