Chandrapur Budget । साऊंड सिस्टीम मध्ये तांत्रिक बिघाड अन् राडा सुरू! चंद्रपूर मनपाच्या आमसभेत नगरसेवकांचा संताप

March 27, 2026 by Prakash Hande

Chandrapur Budget 2026 : चंद्रपूर - चंद्रपूर मनपाचा पहिला ७४६ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्हे यांनी आज सादर केला, या अर्थसंकल्पात अनेक विकासकामांचा समावेश आहे, २७ मार्च रोजी चंद्रपूर मनपाच्या राणी हिराई सभागृहात अर्थसंकल्पीय आमसभेत विरोधकांनी अनेक बाबीवर आक्षेप घेतला, या गोंधळात विकासनिधी ५ लाखांवरून थेट १५ लाखावर मंजूर करण्यात आला.  (चंद्रपूर मनपाचा ७४६ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर)

 

७४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना मनपा सभागृहातील साउंड सिस्टमचा तांत्रिक बिघाडाचा अनुभव नगरसेवकांना मिळाला, सत्ताधाऱ्यांवर विरोधक आज भारी ठरले, नगरसेवक पप्पू देशमुख यांनी अमृत व भूमिगत गटार योजनेचा मुद्दा उपस्थित करीत तत्कालीन आयुक्त विपीन पालीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांच्या कार्यकाळात मर्जीच्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली. त्या कामांची चौकशी करीत पालीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. विरोधक आक्रमक होत असताना सभापती गिर्हे यांनी समयसूचकता दाखवीत पालीवाल यांच्या काळात झालेल्या कामांची फाईल माझ्याकडे देण्यात यावी, त्यावर आम्ही कारवाई करू असे म्हणताच विरोधक शांत झाले.

 

माजी महापौर संगीता अमृतकर यांनी मनपातील ३ झोन मधील किरकोळ कामासाठी २ कोटी ७८ लाखांचा निधी कमी असल्याचे सांगत त्यामध्ये ५ कोटी रुपयांची वाढ करावी अशी मागणी केली. जनतेचे विकासकामे व्हावे याकरिता सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे मात्र आजच्या आमसभा बैठकीत एकच गोंधळ बघायला मिळाला. 

 

Leave a Comment

+