Truck Accident । चंद्रपुरात सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

March 15, 2026 by Prakash Hande

Fatal Truck Accident : चंद्रपूर - लालपेठ कॉलोरी कामगार चौक मध्ये राहणारे तेजकुमार महादेव पाटील हे कामावर जात असताना चंद्रपूर बायपास मार्गावर ट्र्क ने धडक दिली, या अपघातात पाटील यांचा मृत्यू झाला. रामनगर पोलिसांनी ट्र्क चालकावर गुन्हा दाखल केला. (एकाच महिन्यात ३ अल्पवयीन मुली बेपत्ता)

 

१४ मार्च ला तेजकुमार पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वाजता सायकलने कामावर जाण्यासाठी निघाले होते, चंद्रपूर बायपास मार्गावर पोहोचताच ट्र्क क्रमांक MH ४० CM ८५०४ ने पाटील यांना जोरदार धडक दिली, या धडकेत पाटील ट्रक च्या मागील चाकात सापडले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर ट्र्क चालकाने घटनास्थळावरुन वाहन उभे ठेवत पळ काढला.

 

नागरिकांनी तात्काळ पाटील यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. मृतक पाटील यांच्या पत्नीने याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तेजकुमार पाटील यांना धडक देत त्यांच्या मृत्यूला जबाबदार ट्र्क चालकावर कलम १८४, १०६(१) व २८१ अनव्ये गुन्हा दाखल केला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Leave a Comment

+