Chandrapur LCB : चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे घुग्गुस येथील विकास नगर वॉर्ड क्र. ६ परिसरात छापा टाकून गांजासह एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईत १.७१४ किलो गांजा व डिजिटल वजनकाटा असा एकूण १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (घरमालक कामावर तर चोर घरात, चंद्रपुरात घरफोडीची मालिका)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाने संशयितांच्या घरावर छापा टाकला असता गांजा साठवून ठेवलेला आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे १७ हजार रुपये आहे. तसेच ५०० रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजनकाटा देखील जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन घुग्गुस येथे अपराध क्र. १२०/२६ नोंद करण्यात आला असून, आरोपींवर एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २०(बी) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान वैष्णवी वतन ताटेपली (वय ३४, रा. विकास नगर, वॉर्ड क्र. ६, घुग्गुस) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. तिचा पती वतन लक्ष्मण ताटेपली हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व घुग्गुस पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Comment