Chandrapur Mayor Election : चंद्रपूर - चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने तयारी केली असून उद्या काँग्रेसचा महापौर होणार असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
चंद्रपुरात सत्तास्थापनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेले १० नगरसेवक, तसेच इतर मित्रपक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केला. (चंद्रपूर महापौर भाजपने जारी केला व्हीप)
चंद्रपुरात काँग्रेसकडे सध्या २७ नगरसेवकांचे संख्याबळ असून, जनविकास सेना पक्षाचे ३ नगरसेवक आधीच सोबत आहेत. एमआयएम आणि बसपाने जनविकास पक्षाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे एकूण आकडा ३० च्या पार गेला आहे. फक्त दोन नगरसेवकांच्या पाठिब्यांची आवश्यकता काँग्रेसला आहे.
यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वातील १० नगरसेवकांचा गट आणि २ अपक्ष नगरसेवकांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्यास प्राधान्य दिले असल्याने पद वाटपाबाबत मध्यम मार्ग काढण्यात येईल,अस वडेट्टीवार म्हणाले.काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौर पद काँग्रेसकडेच राहील. इतर पदांबाबत मित्रपक्षांना सन्मानजनक ऑफर देण्यात आली असून, त्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सकारात्मक आहे. उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत चंद्रपूर महापालिकेतील सत्तेचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, अस वडेट्टीवार म्हणाले. Chandrapur Mayor Election
कांग्रेस हायकमांड ने महापौर निवडीचे संपूर्ण अधिकार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याजवळ दिले असताना सध्या आमदार वडेट्टीवार सत्तेची जुळवाजुळव करीत असल्याचे दिसत आहे, शिवसेना ठाकरे पक्ष महापौर पदावर ठाम असल्याने महापौर निवडीत क्रॉस वोटिंग होणार अशी पूर्ण शक्यता आहे, शेवटच्या क्षणी आश्चर्यचकित करणारा निकाल लागू शकतो.
Leave a Comment