Murder During Rally : चंद्रपूर - 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सुरु असताना गांधी चौकात नाचताना धक्काबुक्की झाल्याने 5 युवकांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना घडली. य प्रकरणी गुन्हे शाखेने 5 आरोपीना अटक केली आहे. (जमिनीचा वाद शेतकऱ्यांनी केले सामूहिक विष प्राशन)
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सायंकाळ पासून शहरातील विविध विहारातून भव्य रॅली काढण्यात आली.
बाबासाहेबाना मानवंदना देण्यासाठी हजारो अनुयायी रॅलीमध्ये सामील झाले होते.
रात्री 11.30 वाजता इंदिरा नगर मधील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्था तर्फे गांधी चौकात रॅली पोहोचल्यावर डीजेच्या तालावर नाचताना युवकांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकाराने काही युवक चवताळले त्यांनी वाद घालत काही युवकांना मारहाण केली.
हा वाद सोडवण्यासाठी 36 वर्षीय रविकांत टेम्बुरकर यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता काही युवकांनी रविकांत वर चाकूने वार केले, नागरिकांनी रविकांत ला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र वाटेतच त्या युवकाचा मृत्यू झाला. नागरिकांनी या हल्ल्यानंतर एका आरोपीला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले.
या हल्ल्यात अनिकेत गलबले हा युवक जखमी झाला असून घटना घडल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करीत याप्रकरणी 5 आरोपीना अटक केली.
चंद्रपू शहरात प्रथमच बाबासाहेब यांच्या जयंती उत्साहात गालबोट लागल्याची घटना घडली असून रॅली मध्ये सामील युवक चाकू घेऊन फिरत असल्याची गंभीर बाब या निमित्ताने समोर आली आहे.
Leave a Comment