Chandrapur Accident Today: बंगाली कॅम्प चौकात ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

May 07, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - चंद्रपूर शहरात अपघाताची मालिका सुरु असून या मालिकेत आज सकाळी ७ मे रोजी बंगाली कॅम्प चौकात भीषण अपघात झाला, ट्र्क च्या धडकेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. २ दिवसात शहरातील ३ नागरिक अपघाताला बळी पडल्याने नागरिकांमध्ये चांगला संताप उफाळून आला असून यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. (चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्था व्हेंटिलेटरवर)

 

बंगाली कॅम्प परिसरात सकाळच्या सुमारास कामगार वर्गाची मोठी गर्दी असते, सकाळी एक महिला सायकलने कामाला जात असताना त्या महिलेला ट्र्क ने धडक दिली, महिला खाली पडली, तितक्यात ट्र्क चे चाक महिलेच्या डोक्यावरून गेले, महिलेचा जागीच मृत्यू झाला. या चौकात भीषण अपघात होणार यावर उपाययोजना करण्यात यावी यासंबंधी भाजप महामंत्री मनोज पॉल यांनी जिल्हाधिकारी पंत यांना निवेदनही दिले होते. मात्र प्रशासनाने त्या निवेदनाची दखल घेतली नाही.

 

२ दिवसांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील डॉमिनोझ पिज्जा सेंटर समोर ३८ वर्षीय उमाकांत वाघमारे हे कामावरून आपल्या दुचाकी वाहनाने घरी जात असताना रस्त्याच्या मध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाने दार उघडले, अचानक दार उघडल्याने उमाकांत च्या दुचाकीची कट लागत तो खाली कोसळला, उठण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमाकांत च्या अंगावरून टँकर चे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावर आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी आवाज उचलत निवेदनाच्या माध्यमातून या मार्गावरील खरी परिस्थिती पुढे आणि वाहतूक पोलीस निरीक्षकाच्या बेजबाबदार पणामुळे या मार्गावर वाहन चालक रस्त्यावर वाहने उभे करतात, त्यांची बदली करा अशी मागणी राईकवार यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.

 

त्याच दिवशी प्रदीप सिडाम नामक युवकाचा सावरकर चौकात वळण घेत असताना भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने प्रदीप च्या दुचाकीला धडक दिली, प्रदीप खाली कोसळला, मात्र तोवर ट्र्क चे चाक त्याच्या अंगावरून गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन घटना घडल्यावर सुद्धा प्रशासन जागे झाले नाही. ७ मे रोजी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे महिलेचा बळी गेला. बंगाली कॅम्प चौकात नेहमीच ट्र्क ची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. चौकात असणाऱ्या बार व वाईन शॉप मुले नागरिक आपली वाहने रस्त्यावर ठेवत असल्याने नागरिकांना स्वतःचा मार्ग काढणे कठीण होतो, त्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता वाढते, याबाबत निवेदन दिल्यावर सुद्धा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. चंद्रपुरातील राजकीय जनप्रतिनिधी या गंभीर समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

Leave a Comment

+