Shop Vandalism | चंद्रपूर बनलं गुन्हेगारीचं माहेरघर?, मार खाल्ला, मित्रांना बोलावलं, थेट दुकानावर हल्ला

April 25, 2026 by Prakash Hande

Chandrapur Shop Vandalism : चंद्रपूर - शहरातील अतिव्यस्त अभय टॉकीज समोरआज सकाळी भाऊ चा नाश्ता सेंटर मध्ये मोठा वाद झाला. वाद इतका वाढला कि काही युवकांनी नाश्ता सेंटर दुकानात तोडफोड सुरु केली. या घटनेमुळे चंद्रपुरातील गुन्हेगारी वृत्ती पुन्हा एकदा पुढे आली आहे. १४ एप्रिल रोजी झालेलं हत्याकांड तर दुसऱ्या दिवशी शहर पोलीस स्टेशनच्याच हद्दीत होणाऱ्या हत्याकांडाची घटना बघता गुन्हेगार पोलिसांना न जुमानणारे झाले आहे.  (चंद्रपुरात जेष्ठ नागरिक असुरक्षित, घरात घुसुन...)

 

सकाळ झाली कि नागरिक चाय, टपरी व पान सेंटरमध्ये आपल्या आवडीचे पदार्थ सेवन करायला जात असतात, २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अभय टॉकीज समोरील भाऊ चा नाश्ता सेंटर मध्ये सकाळी खवय्यांची गर्दी उसळली होती, गर्दीत चालक व ग्राहकात वाद झाला असल्याची माहिती आहे, वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले, त्यानंतर मार खाल्लेल्या ग्राहकाने फोन करीत आपल्या मित्रांना बोलाविले असता त्याच्या मित्रांनी कशाचाही विचार न करता थेट लाकडी दांड्याने दुकान चालकाला झोडपणे सुरु केले. हा सर्व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. (बघा व्हिडीओ ...क्लिक करा)

 

इतकेच नव्हे तर काही युवकांनी थेट दुकानाची तोडफोड सुरु केली, नागरिकांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर वाद शमला, याबाबत दुकान चालक शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी दोघांमध्ये समन्व्य घडवीत आपसी समझोता करीत वाद मिटविला, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. 

चंद्रपूर शहर आता गुन्हेगारी वृत्तीचे माहुरेघर बनले असल्याचं चित्र आहे, गंभीर गुन्हा करण्यात आजकाल कुणीही मागे पुढे बघत नाही. याउलट मोठ्या शहरात जर कुणी समाजमाध्यमांवर आपल्या दहशतीची रील जरी बनवली तर त्याला खाकीने उत्तर दिल्या जाते, यासह गुन्हा दाखल करण्यात येतो, चंद्रपुरात असे प्रकार कधीच होताना दिसत नाही.

 

आज समाजमाध्यमांवर अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीने आपली दहशत व्हायरल केली आहे त्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन कारवाई करीत नाही, पोलीस या गुन्हेगारी प्रवृत्तीला त्यांच्याच पद्धतीने कधी उत्तर देणार हा प्रश्न अद्यापही निरुत्तरित आहे. 

Leave a Comment

+