चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील बाजार वॉर्ड, गंज वॉर्ड, बालाजी वॉर्ड, पठाणपुरा, बाबूपेठ, भानापेठ, हॉस्पिटल वॉर्ड, एकोरी वॉर्ड, महाकाली वॉर्ड, जलनगर वॉर्ड, बिनबागेट वॉर्ड, रामनगर, दादमहल वॉर्ड, गौतम नगर, समाधी वॉर्ड, कोतवाली वॉर्ड, दादमहल परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, अंचलेश्वर गेट परिसर, ताडबन परिसर तसेच भिवापूर परिसरांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी अजूनही नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. मागील दोन वर्षांपासून अमृत योजनेअंतर्गत केवळ पाईपलाईन व मीटर बसविण्याचे काम करण्यात आले, मात्र नागरिकांच्या नळाला आजही पाणी येत नसल्याने महिलांना ४६° डिग्री च्या कडक उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (मान्सूनपूर्व नाले सफाई करा - कांग्रेसचे निवेदन)
Leave a Comment