Mobile Forensic Lab : चंद्रपूर - जिल्ह्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील घटनास्थळी पुरावे संकलन करण्यासाठी पोलीस दलात ५ अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन तज्ञांसह दाखल झाले असून विविध गुन्ह्यातील तपासाला आता नवी दिशा मिळणार आहे. आता जिल्ह्यात एकूण फॉरेन्सिक व्हॅनची संख्या एकूण ७ झाली आहे. (चंद्रपूर जिल्ह्याला मिळाल्या प्रथम महिला जिल्हाधिकारी)
या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मध्ये रक्त, केस, कपडे यांचे नमुने घटनस्थळावरून संकलित करता येतात, बोटांचे ठसे तपासणी, संकलित केलेल्या नमुन्यांचे विश्लेषण प्रयोगशाळेत करता येणार, स्फोटक पदार्थ सपासणीसाठी आवश्यक किट्स उपलब्ध, रक्त व डीएनए सॅम्पल, लैंगिक अत्याचार्याच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष पुरावे गोळा करण्याची व्यवस्था या अत्याधुनिक व्हॅन मध्ये करण्यात आली आहे.
पोलीस दलात सामील झालेल्या या ५ अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मुळे घटनास्थळावरील सूक्ष्म पुरावे गोळा करीत गुन्ह्याचा छडा लवकरात लवकर लावता येणार असून सदर व्हॅन पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर उपविभाग, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, मूल, राजुरा आणि गडचांदूर उपविभागात कार्यरत असणार आहे.
Leave a Comment