Mungantiwar Insult Allegations : चंद्रपूर - चंद्रपूर शहरात राजमाता हिराई महोत्सवात राजशिष्टाचाराचे पालन न केल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाची तक्रार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली. खासदार धानोरकर यांच्या भाषणावेळी वाजत गाजत मुनगंटीवार यांचे आगमन झाले असता खासदारांना आपले भाषण मध्येच आटोपते घ्यावे लागले, खासदार यांच्या संबोधनांनंतर पालकमंत्री यांचे भाषण राज शिष्टाचार नुसार व्हायला पाहिजे मात्र तसे न झाल्याने खासदार धानोरकर यांनी प्रशासनाच्या या वागणुकीमुळे कार्यक्रमावर बहिष्कार करीत मंच सोडला. (काय म्हणाल्या कुंदा जेनेकर...व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा)
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने राणी हिराई महोत्सवाला २५ लाखांचा निधी दिला होता, शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळणे गरजेचे होते मात्र तसे काही झाले नाही खासदार प्रतिभा धानोरकर यांचा बल्लारपूर चे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जाणीवपूर्वक अपमान केल्याचा थेट आरोप चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसच्या अध्यक्षा कुंदा जेणेकर यांनी केला.
स्थानीय विश्रामगृहात कुंदा जेनेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार मुनगंटीवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले. शासनाचा कार्यक्रम हा राजशिष्टाचार नुसार व्हायला हवा होता मात्र मुनगंटीवार यांच्या दबावापुढे शिष्टाचार पाळला गेला नाही. जेनेकर पुढे म्हणाल्या कि यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणूक प्रचार सभेत मुनगंटीवार यांनी बहीण-भावाच्या नात्याला गालबोट लावण्याचे कामे केले होते. त्यामुळे ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे त्यांनी सिद्ध केले आहे. (लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार, काय आहे कारण)
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा अपमान म्हणजे जिल्ह्यातील महिलांचा अपमान आहे, आम्ही हे कदापि सहन करणार नाही, चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेस तर्फे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध नोंदविण्यात आला. आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेविका सुनंदा धोबे व अनु दहेगावकर यांची उपस्थिती होती.
Leave a Comment