Prahar Janshakti Party : चंद्रपूर - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत व्हावं यासाठी अक्षय बोन्दगुलवार यांची चंद्रपूर जिल्हा संघटक पदावर नियुक्ती केली आहे. बोन्दगुलवार यांच्याकडे चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड व ब्रह्मपुरी क्षेत्राचा कार्यभार असणार आहे. (चंद्रपूरच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने दिली मानवंदना)
शेतकऱ्यांसाठी लढणारे लढवय्ये बच्चू कडू यांनी राज्यात प्रहार पक्षाला झळाळी देण्याचे काम केले आहे, शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांनी सरकारविरोधात मोठा लढा उभारला होता, सरकारला त्यांच्या आंदोलनापुढे नमते घेत, कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. याशिवाय शेतकऱ्यांच्या इतर समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी राज्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात प्रामाणिक पदाधिकारी निवड सुरु केली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षात मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिक काम करणाऱ्या अक्षय बोन्दगुलवार या सामान्य कार्यकर्त्याला थेट जिल्हा संघटक पदावर बढती देत त्यांचा सन्मान केला आहे. बोन्दगुलवार यांच्या नियुक्तीवर जिल्ह्यातील प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढील वाटचालीसाठी बोन्दगुलवार यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a Comment