चंद्रपुरात खळबळ! न्यायालयात तारखेसाठी आलेल्या महिलेला महिलेनेच केली बेदम मारहाण

March 08, 2026 by Prakash Hande

Rajura Woman Assault Case : चंद्रपूर  :  न्याय मिळविण्यासा'ी न्यायालयात तारखेसा'ी येणार्‍या एका महिलेवर भरदिवसा रस्त्यावर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना राजुरा शहरातील पंचायत समिती चौकात घडली. या प्रकरणात पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवून समज देऊन सोडल्याचा आरोप संबंधित महिलेने केला असून, आपल्या जीवाला धोका असल्याने आरोपीवर कडक कारवाई करून न्यायालयात येताना सुरक्षा देण्याची मागणी तिने पत्रकार परिषदेत केली आहे. (१९ मार्चपासून चंद्रपुरात महाकाली मातेचा जागर)

 

मिळालेल्या माहितीनुसार, पोर्णिमा  रामटेके या दिनांक ६ मार्च २०२६ रोजी राजुरा न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाच्या तारखेसा'ी आल्या होत्या. त्या ऑटोमधून पंचायत समिती चौकात उतरल्या असता, तिथे आधीच थांबून असलेल्या रिता संतोष तुराणकर हिने त्यांना अडवून सर्वांसमोर बेदम मारहाण केल्याचे पोर्णिमा रामटेके यांनी सांगितले. या मारहाणीत त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन  छातीवरही मार लागल्याचे त्यांनी सांगितले. मारहाणीनंतर संबंधित महिलेने आणखी काही व्यक्तींना फोन करून बोलावल्याचेही पोर्णिमा यांनी सांगितले. परिस्थिती बिघडू शकते याची जाणीव झाल्याने आपण तातडीने ऑटोमध्ये बसून न्यायालयात निघून गेले, असे त्यांनी स्पष्ट केले. Street Violence

 

घटनेनंतर पोर्णिमा रामटेके यांनी राजुरा पोलिस 'ाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदविला आहे. मात्र यापूर्वीही रिता तुराणकर हिने दोन वेळा आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार दिली होती, तरीही प्रत्येक वेळी केवळ एनसी नोंदवून प्रकरण सोडून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रपरिषदेत केला. रिता तुराणकर ही आपल्या पतीच्या परिचयातील महिला असल्याचा दावा पोर्णिमा रामटेके यांनी केला आहे. आपल्या जीवाला धोका असून आरोपीविरुद्ध क'ोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच न्यायालयीन तारखांना येताना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, पोर्णिमा रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०१२ मध्ये त्यांचे वेकोलि येथील कर्मचार्‍यांशी लग्न झाले होते. काही वर्षांनंतर घरगुती वाद वाढल्याने पतीने मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या त्या आपल्या विधवा आईसोबत मध्यप्रदेशातील नेपानगर येथे माहेरी राहत असून न्यायालयात त्यासंदर्भातील दावा सुरू आहे. या घटनेमुळे न्याय मिळविण्यासा'ी न्यायालयात येणार्‍या महिलेलाच भररस्त्यात मारहाण होत असल्याने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन क'ोर कारवाई करावी, अशी मागणी पोर्णिमा रामटेके यांनी केली आहे.

Leave a Comment

+