Two Wheeler Accident : वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील भणारहेटी येथील शेतकरी मारोती सीताराम कष्टी (वय ४७) यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १४) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. (वरोरा तालुक्यात एकाच दिवशी ३ अपघात)
मिळालेल्या माहितीनुसार, कष्टी हे धार्मिक कार्यक्रमासाठी एमएच-३४ क्यू ६०२२ क्रमांकाच्या दुचाकीवरून चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या गावी परतत असताना तारडा-घाटकुळ पुलाजवळील रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक रस्त्याखाली कोसळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, कुलथा यात्रा महोत्सव सुरू असल्याने त्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. कष्टी यांचा तोल जाऊन अपघात झाला की मागून येणाऱ्या अन्य वाहनाची धडक बसली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Leave a Comment