Warora Police । मैत्रीत रक्ताची धार! वरोऱ्यात दारू पिऊन बसले अन् थेट डोक्यावरच फोडली बाटली

March 18, 2026 by Prakash Hande

Warora Police crime news : वरोरा - मैत्रीत दारू पिली मात्र त्यानंतर वाद झाला आणि त्या वादात बाटली डोक्यावर फोडली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील हि घटना. याप्रकरणी मित्राने मित्राविरुद्ध पोलीस तक्रार दिली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. (वरोऱ्यात बनावट दारूचा महापूर)

 

१७ मार्च रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ३३ वर्षीय दिनेश उत्तम गुरवे हा साई मंगल कार्यालयाजवळ फिरत होता, त्याचवेळी त्याचा मित्र रोहित उर्फ गोलू कृष्णा शेंडे त्याठिकाणी आला. कमेकांची विचारपूस करीत दोघे दारू प्यायला बसले. दारू पिली आणि नशा चढली. दारूच्या नशेत दिनेश व रोहित मध्ये वाद झाला. 

 

या वादात रोहितने दिनेश च्या डोक्यावर दारूची बाटली फोडली, २ ते ३ वार झाल्याने दिनेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून रक्त निघू लागले, यामुळे दिनेश जागीच कोसळला. बराच वेळ दिनेश अर्धमेल्या अवस्थेत होता. याबाबत दिनेशचे मामा राकेश श्रीरंग यांनी दिनेश ला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दिनेश ने याबाबत वरोरा पोलिसांना झालेल्या वादाची कहाणी कथन केली, वरोरा पोलिसांनी रोहित शेंडे वर कलम ११८ (१) अनव्ये गुन्हा दाखल केला. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

Leave a Comment

+