चंद्रपूर शहरातील हा भाग पुन्हा पाण्याखाली जाणार

News34

चंद्रपूर- दि.18 जुलै रोजी संपूर्ण शहर जलमय झाले असतांना सर्वात जास्त फटका बसला तो चांभारकुंडी नाला वाहत जात असलेल्या तुकूम,वडगाव,नगीनाबाग प्रभागाला हा मोठा नाला वाहत जात रहमत नगर सिवरेज ट्रीटमेन्ट प्लांट मागे इरई नदीत मिळतो.

चंद्रपूर महापालिकेच्या थातूर-मातुर पद्धतीने नाल्याचे खोलीकरण-सफाई,अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराने नाल्यावर व रस्त्यावर झालेल्या अतिक्रमनाने या प्रभागांना सर्वात जास्त फटका 18 व 28 जुलै रोजी बसला. दि.18 ऑगस्ट पासून विदर्भात ऑरेंज अलर्ट घोषित झाल्या नंतर पुन्हा शहरातील काही भाग बुडण्यास कारणीभूत ठरणार आहे.

ट्रेंटमेन्ट प्लांट जवळील चांभारकुंडी नाल्यावर पुन्हा माती टाकून तयार करीत असलेला हा 20 फूट रुंद व 40 फूट लांब रपटा. जो नाल्या पलीकडील ट्रीटमेन्ट प्लांट मध्ये अवजड यंत्र सामुग्री,जड वाहतूक करणारे आयवा-ट्रक,पोकलन व jcb मशीन व कामगार-कर्मचारी यांचे वाहन यांना जाने सुलभ करण्यासाठी ठेकेदार बनवीत आहे. परंतु पावसाळा अजून बाकी असतांना व अलर्ट असतांना हे कृत्य म्हणजे अगोदरच पुराचा फटका सोसलेल्या तुकूम,वडगाव,नगीनाबाग प्रभागातील जनतेला पुन्हा पुराचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

प्रशासनाने पुरास पुन्हा कारणीभूत ठरणारा चांभारकुंडी नाल्यात माती टाकून बनविलेला रपटा त्वरित हटवावा अशी मागणी इरई बचाव जनआंदोलनाचे संयोजक व वृक्षाई चे संस्थापक कुशाब कायरकर यांनी केली आहे.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment