वरोरा: Pratibha Dhanorkar Ganesh Utsav निमित्ताने वरोरा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मंगल सोहळ्याला मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर यांनी उपस्थित राहून पूजा केली. दोघांच्या हस्ते वेदोक्त मंत्रोच्चारात महाआरती पार पडली. यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते दर्शनासाठी उपस्थित होते. (हे हि वाचा – सलग दुसऱ्या वर्षी शीतला माता पथकाने फोडली भाऊंची दहीहंडी)
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वरोरा येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात लाडक्या बाप्पाचे अत्यंत भक्तीभावात आणि उत्साही वातावरणात आगमन झाले आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून जनसंपर्क कार्यालयात श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मंगलमयी सोहळ्याला मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
Pratibha Dhanorkar Ganesh Utsav : वरोरा कार्यालयात चैतन्याचे वातावरण
गणेशोत्सवाच्या निमित्ताने खासदार कार्यालयाचा परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि नेत्रदीपक रोषणाईने सजवण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या गजर आणि “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” या जयघोषात बाप्पाच्या मूर्तीचे कार्यालयात आगमन झाले. यानंतर श्रींची स्थापना करण्यात आली. मानस धानोरकर व पार्थ धानोरकर यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा आणि मंगल आरती संपन्न झाली.
बाप्पाच्या आगमनामुळे कार्यालयातील वातावरण भक्तीमय आणि चैतन्यमय झाले होते. या वेळी मानस आणि पार्थ धानोरकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “विघ्नहर्त्या बाप्पाच्या आशीर्वादाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनींच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे,” अशी प्रार्थना यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी श्री चरणी केली.
स्व. खासदार बाळू धानोरकर आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत वरोरा येथील जनसंपर्क कार्यालय हे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे या कार्यालयातील गणेशोत्सवाला दरवर्षी विशेष महत्त्व प्राप्त होते. बाप्पाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून तालुक्यातील विविध भागांतून कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या प्रतिष्ठापना सोहळ्यास काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, महिला प्रतिनिधी, युवक कार्यकर्ते तसेच धानोरकर कुटुंबाचे आप्तेष्ट आणि वरोरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






