चंद्रपूर : वणी येथील अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या (Rudra Dhonge Heart Surgery) मोफत शस्त्रक्रियेमुळे त्याला नवीन आयुष्य मिळाले आहे. त्याच्या हृदयात जन्मजात छिद्र असल्याचे निदान झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आई-वडिलांची सुरू असलेली धडपड पाहून आमदार किशोर जोरगेवार यांनी तातडीने पुढाकार घेतला. आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील प्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये रुद्रची मोफत हृदय शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. (आमदार जोरगेवार यांच्या मध्यस्तीने कामगारांचे आंदोलन यशस्वी)
Rudra Dhonge Heart Surgery : चिमुकल्या रुद्रला मिळाले नवजीवन
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४६ बालकांच्या निःशुल्क हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रुद्र धोंगेचाही समावेश होता. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुद्रला नवजीवन मिळाले असून आज तो सर्वसामान्य मुलांप्रमाणे निरोगी आयुष्य जगत आहे.
रुद्रची भेट झाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “लोकप्रतिनिधी म्हणून रस्ते, पूल, इमारती उभारता येतात; मात्र एखाद्या चिमुकल्याला नवजीवन देण्याची संधी मिळणे आणि एका आईच्या डोळ्यांतील अश्रू आनंदात बदलताना पाहणे, याहून मोठा सन्मान दुसरा असू शकत नाही. रुद्रच्या चेहऱ्यावरचे हे निरागस हास्य कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मौल्यवान आहे.”
यावेळी त्यांनी परमेश्वराकडे रुद्रच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच भविष्यातही अशाच गरजू कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची संधी मिळावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
रुद्रच्या पुनर्भेटीने सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशील लोकप्रतिनिधित्वाचे एक प्रेरणादायी उदाहरण पुन्हा एकदा समोर आले असून, या क्षणाने उपस्थितांच्या मनात कायमची भावनिक आठवण निर्माण केली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






