Shegaon Sand Smuggling; विना रॉयल्टी रेती घेऊन जाणारा ट्रॅक्टर पकडला; शेगावमध्ये LCB ची कारवाई

चंद्रपूर – Shegaon Sand Smuggling प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अवैध रेतीची वाहतूक करणारा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान चालकाला ताब्यात घेण्यात आले असून ट्रॅक्टर मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोधी ते कारेगाव मार्गावर ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास शेगाव पोलिसांकडून सुरू आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात २ अल्पवयीन मुली बेपत्ता)

Shegaon Sand Smuggling प्रकरणात LCB ची धडक कारवाई

जिल्ह्यातील शेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ५ लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि ५ हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस हवालदार जय उमेश सिंह, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे आणि पोहवा सचिन गुरनुले हे वरोरा विभागात पेट्रोलींगवर असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून पारोधी ते कारेगाव रोडने ट्रॅक्टरद्वारे अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह कारेगाव बसस्टँड चौक येथील स्मशानभूमीजवळ नाकेबंदी केली. यादरम्यान पारोधी रोडने कारेगावच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद लाल रंगाच्या विनाक्रमांकाच्या महिंद्रा युवराज ट्रॅक्टरला थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पाहणी केली असता, त्यात विना रॉयल्टी चोरून आणलेली अंदाजे १ ब्रास रेती आढळून आली.

या प्रकरणी ट्रॅक्टर चालक सुरज गजानन जिवतोडे (वय २१, रा. शेगाव खुर्द, ता. भद्रावती) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने ही रेती पारोधी गावातील नाल्याच्या पात्रातून ट्रॅक्टर मालक विकास ईश्वर धांडे (रा. बोरगाव, ता. भद्रावती) याच्या सांगण्यावरून आर्थिक फायद्यासाठी चोरी करून आणल्याची कबुली दिली. या कारवाईची पंचांसमक्ष व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. तक्रारदार पोहवा जय उमेश सिंह यांच्या लेखी रिपोर्टवरून शेगांव पोलिसांनी चालक सुरज जिवतोडे आणि मालक विकास धांडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२), ४९, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) आणि मोटर वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरीश महदेव येरमे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment