त्या कुटुंबाला संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

News34 chandrapur गुरू गुरनुले

मूल – शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाही सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा हे आपल्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले.

शेतकरी हा कुटुंबाचा आधार असतो.तोच गेला तर संपूर्ण कुटुंबच निराधार होतो ही दुर्दैवी घटना घडली.त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई टिकले, मुले ईश्वर व रुपेश असा परिवार आहे.

 

मूल तालुक्यातील यापूर्वीही चिचाळा येथे वाघानेच एका दिवशी दोघांचा बळी घेतल्याची घटना ताजीच आहे. शेतकरी सुर्यभान टिकले यांनी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत हे मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करुन स्वतःहा कडून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.

 

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, तेजराज ठेमस्कर, बालाजी निकूरे, चालदेव मांदाडे, बबलू गांडलेवार, मुन्ना मडावी, सूरज इतकेलवार, ग्रा. प सदश जनार्दन आत्राम, कृष्णाजी टिकले, सुभाष मंकीवार, अनुप लेंनगूरे, श्रीनिवास टिकले, उपसरपंच सूरज चलाख, पोलिस पाटील दुर्गे, माजी उपसरपंच यशवंत चलाख, पवन बलगेलवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम. ५२२ कक्षात त्याच्याच शेतात त्याचा घोट घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

याबाबत संतोष सिंह रावत यांनी कुटुंबियांसमोर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे यांना मोबाईल वर बोलून वनविभागाकडून तात्काळ पूर्ण आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. तसेच वन्य प्राणी वाघ,रानटी डुकरे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करीत असल्याने त्याचाही बंदोबस्त करावा.व वणाला तारेचे कुंपण करावे अशी मागणी देखील याप्रसंगी केली.

Leave a Comment