चंद्रपुरात आज रंगणार दहीहंडी स्पर्धेचा थरार

News34 dahi handi 2023

चंद्रपूर – जन्माष्टमी चा सण आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या उत्साहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटातर्फे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

चंद्रपूर शहरात प्रथमच शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केल्याने जिल्ह्यातील गोविंदा यांना यामध्ये सहभागी होण्याची संधी चालून आली आहे.

 

7 सप्टेंबर ला रामनगर सिंधी पंचायत मैदानावर सायंकाळी 5 वाजता या स्पर्धेचा रोमांचक थरार नागरिकांना बघायला मिळणार आहे, सोबतच गोविंदाच्या चमुला रोख 1 लक्ष रुपयांचे बक्षीस सुद्धा शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

 

गोविंदा पथकाची दहीहंडी फोडण्याची चुरस बघण्यासाठी असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून जन्माष्टमी चा उत्साह द्विगुणित करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केले आहे.

Leave a Comment