मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

News34 chandrapur

चंद्रपूर – बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे 67 व्या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन 27 डिसेंम्बरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेच्या अभूतपूर्व आयोजनाबद्दल मुनगंटीवार यांचं भरभरून कौतुक केले.

 

उदघाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आंतरराष्ट्रीय धावपटू हिमा दास, पद्मश्री बहाद्दूर सिंग चव्हाण, ललिता बाबर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आदींची उपस्थिती होती.

 

स्पर्धेचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले.

 

यावेळी धावपटू हिमा दास यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभूतपूर्व आयोजनाबद्दल आभार मानले, सोबतच सर्व खेळाडूंना खेळात आपल्या राज्याचे नाव उंचवावे असे आवाहन केले.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाच्या भूमीत आपण आपल्या राज्याचे नाव उंचवायला आले आहेत इथं आल्यावर वाघाची वृत्ती आपल्यात आणा, आपण विविध राज्यातून आलात मात्र राज्यसहित व देशाचं नाव आपण सर्वांनी पुढे न्यावे असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गवगवा केला, देशात मागील 50 वर्षात जे झालं नाही तसा विकास पंतप्रधान मोदी यांनी केला आहे, पंतप्रधान मोदी यांचे फिट इंडिया स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे, व पुढे मिशन ऑलम्पिक चे ध्येय आपण पुढे ठेवावे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका तालुका ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेचे अभूतपूर्व आयोजन, हे मुनगंटीवार यांना चांगलेच जमले, मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला या शब्दात शिंदे यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांचं कौतुक केले.

आयोजित स्पर्धा उदघाटन प्रसंगी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

 

 

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाला अधिकाऱ्यांनी लावला बट्टा

खेळाडूंचा काढता पाय
पाहुण्यांचे भाषण लांबताच खेळाडू बाहेर निघाले

आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे भाषण लांबल्याने खेळाडूंनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. धावपटू हिमा दास यांच्या भाषण दरम्यान खेळाडूंनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केले हे विशेष.

 

पोलिसांवर भरोसा नाय का?

 

राष्ट्रीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना सुद्धा आयोजकांनी खाजगी बाऊन्सर लावले, भाषण लांबल्याने खेळाडू बाहेर जात असताना बाऊन्सर त्यांच्या मार्गावर आडवे होत त्यांना खाली बसवीत होते. या प्रकाराने काही खेळाडू अक्षरशः घाबरून गेले होते, त्यांनी बाहेर निघण्यासाठी दुसरा मार्ग निवडला.

 

भविष्यातील हे मोठे खेळाडू आणि हे नियोजन?
National athletic
कार्यक्रम संपल्यावर खेळाडूंना माल वाहतूक करणाऱ्या वाहनात नेण्यात आले

कार्यक्रम संपला, नागरिक घरी निघाले, पाहुणे आपल्या मार्गावर निघाले मात्र अश्यातच माल वाहतूक करणाऱ्या वाहनात स्पर्धेत सहभागी खेळाडूंना नेण्यात आले, आहो कुणी जनावरांना सुद्धा असे नेत नाही, आणि आपले अधिकारी त्यांना अशी वागणूक देतात हे बरं नाही, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी अहोरात्र मेहनत घेतली मात्र आयोजन समिती मधील जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांनी काही प्रमाणात कार्यक्रमाला बट्टा लावलाचं

Leave a Comment