चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटावर खुनी संघर्ष

News34 chandrapur

गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड प्रवृत्तीच्या रेतितस्करांचा दि.(२८) गुरुवारी रात्री १ वाजता दरम्यान गावकऱ्यांनी जेसीबी व पोकलेन नदिघाटात टाकायला अडवल्यानंतर तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात सरपंचा सह महिलांना मारहाण करण्यात आली. तारडाचे शिवसेना (उबाठाचे) सरपंच तरुण गंगाराम उमरे,तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली.

 

गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटासह अनेक घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने स्टॉक तयार करत रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

 

स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टीच्चून रेती तस्करी केल्या जात आहे.जिल्हा प्रशासनाने रेती घाटावर उरलेला स्टॉक उचलण्याची(३१) डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती. मात्र अनेक घाटावर स्टॉक शिल्लक नव्हता मिळालेल्या परवानगीच्या आधारावर संधीचा फायदा घेत स्टॉक व्यतिरिक्त पुन्हा नदीपत्रातून रेती उपसा करने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करांकडून दादागिरी करत रेती उपसा सुरू आहे.

 

नदीपात्रात जेसीबी, हायवा, पोकलेनचा वापर करू नये यासाठी सरपंच, तमुस अध्यक्ष यांच्यासह काही महिलांनी रेती घाटावर धडक दिली.शाब्दिक वादानंतर मारहाणीत रूपांतर झाले.रेती तस्करांनी लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांची ओळख पटली असून हल्लेखोरांनी घटस्थळावरून पळ काढला.

 

 

जखमींच्या बयानानुसार ३०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे, आरोपीना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय मोगरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

 

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सरपंच तरुण उमरे हे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहे व विशेष बाब म्हणजे पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांच्यासहित दोघांवर गुन्हे दाखल केले आहे, सदर प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आरोपी स्वप्नील काशीकर हे सध्या पसार झाले आहे त्यांना पकडण्यासाठी पथक निघाले आहे, महत्वाची बाब म्हणजे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की ज्यावेळी हा वाद मारहाण झाली त्यावेळी मी तिथे नव्हतो याबाबत माझ्याकडे सर्व पुरावे देखील आहे, मला या गुन्ह्यात फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

ठाणेदार राजगुरू यांना कदाचित काशीकर यांची लोकेशन मिळत नसेल अन्यथा पोलीस विभाग मोबाईल लोकेशन घेऊन सुद्धा आरोपीना अटक करतात, फक्त गोंडपीपरी पोलीस याला अपवाद ठरली आहे, जिल्ह्यात अवैध रेती माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे,  प्रशासनाच्या संमतीने हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे, प्रशासनाची संमती असल्याशिवाय अवैध वाळू माफिया इतकी हिम्मत करु शकत नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!