News34 chandrapur
ब्रह्मपुरी – अध्यात्म मार्गाची वाट धरून सत्संगाची शिकवण घेण्यासाठी पवित्र मनाने आपल्या भूत काळातील चुकांची माफी मागून ईश्वराची आराधना करणे व महायज्ञात दृष्ट वृत्तीचे दहन करून मनातील अहंकार, द्वेष भावना याचा नाश करणे हेच भागवत सप्ताहा मागील उदांत हेतू होय.या अध्यात्म सप्ताहाचा समारोप म्हणजे हा सर्व घराघरातील विचारांनी एकत्र येऊन घातलेला मेळ हा गोपालकाला होय. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा येथे आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह निमित्ताने बोलत होते.
या प्रसंगी प्रामुख्याने मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव कीरसान, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, महिला काॅंग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, माजी नगरसेवक जगदीश आमले, चौगानचे सरपंच उमेश धोटे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाजी तुपट, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, सरपंच दौलत ढोंगे, उपसरपंच सोनाली सुर्यवंशी, बाजार समितीचे संचालक ब्रम्हदेव दिघोरे, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष पांडुरंग दिघोरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव डि.के.मेश्राम, संजय मिसार यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अध्यात्म व सत्संगाचा मार्ग हा ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग आहे. या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह निमित्ताने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण पसरले असून यातून गाव एकोब्याचे दर्शन घडते.असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी आयोजकांकडून विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तर गावात स्वच्छता अभियान राबवून गाव नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच गाव हा विश्वाचा नकाशा असुन गावांच्या समृध्ततेवरून देशाची ओळख होत असते. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत पुढाकार घ्यावा असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी मार्गदर्शनपर भाषणातून केले. यानंतर संपूर्ण ग्राम वासियांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक कमिटी व संपूर्ण बेटाळा ग्राम वासी यांनी अथक परिश्रम घेतले.