चंद्रपुरात रक्तगटावरून कामगार संघटना आमनेसामने

News34 chandrapur

चंद्रपूर – वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या लालपेठ येथील उपविभागीय कार्यालयात 16 डिसेंबर ला सायंकाळच्या सुमारास कामगार संघटनांनी चांगलाच गोंधळ घातल्याने वेकोली व्यवस्थापनाची चांगलीच भंबेरी उडाली होती.

 

मागील काही दिवसापासून वेकोलीच्या लालपेठ येथील क्षेत्रीय रुग्णालयात वेकोली कर्मचारी गंभीर आजारावर उपचार घेत आहे, दोन दिवसांपूर्वी त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले, त्याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना O Positive रक्त आणा अशी चिठ्ठी पण दिली मात्र रक्त आणण्यास गेलेल्या नातेवाईकांना ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांनी रुग्णाला O नाहीतर A Positive रक्त द्यावे लागेल कारण त्यांचा रक्तगट A POSTITIVE आहे, हे ऐकताच नातेवाईक वेकोली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर संतापले त्यांनी तात्काळ त्याठिकाणी इंटक कामगार संघटनेला याबाबत माहिती दिली.

 

संघटनेचे सदस्य त्याठिकाणी दाखल होताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करू लागले होते, मात्र रुग्णालयातील कर्मचारी दुसऱ्या संघटनेचे असल्याने HMS संघटनेने कर्मचाऱ्यांची बाजू घेणे सुरू केले, आणि कार्यालय परिसरात दोन्ही संघटना एकमेकांविरुद्ध नारेबाजी करू लागले.

 

शेवटी उपविभागीय वेकोली अधिकाऱ्याला मध्यस्ती करावी लागली, कारवाईचे आश्वासन मिळाले मात्र दुसऱ्या संघटनेणें यावर आक्षेप घेतला आता यावर वेकोली महाव्यवस्थापक काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागले आहे, कारण असे प्रकार याआधी सुद्धा घडले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!