News34 chandrapur
चिमूर :- गुणवंत चटपकार
जिल्हा सेवानिवृत्त प्राथ शिक्षक संघाचे वतीने चिमूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली, व समस्याचे निवेदन देण्यात आले.
गटविमा शिल्लक प्रस्ताव, उपदान, अंशराशिकरण, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे वैद्यकिय रजेची देयके,30 जून ला सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी 1 जुलै ची काल्पनिक वेतन वाढ लावुन रिवाईज पेंशन केस तयार करून लाभ देणे,80 वर्ष पूर्ण झालेला शिक्षकांना वेतन वाढ देण्याबाबत, कुटुंब निवृत्ती धारकाचे वेतन बाबत, माहे जानेवारी डिए 3% फरकाची रक्कम सेवानिवृत्त शिक्षकांना देणेबाबत,तसेच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे सातवे वेतन आयोगाचे हप्ते, या बाबत चर्चा करण्यात आली पहिला हप्ता 4 शिक्षक, दुसरा हप्ता 56 शिक्षकांचा, 3 हप्ता 104 शिक्षकांचा एकूण रुपये 8898912/देने बाकी असल्याने याकरीता जि.प.कडे मागणी करण्यात आली असून पैसे प्राप्त होताच सदर हप्ते सेवाज्येष्ठतेनुसार देण्यात येईल असे मान्य केले, तसेच सर्वांचे वेतन वेळेवर करण्यात यावे याबाबत सुध्दा चर्चा करण्यात आली, सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात, सदर समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे मान्य केले.
यावेळी संघटनेचे श्याम लेडे, दिपक पंधरे, हेमराज कामडी, अनिल काळे, नगाजी साळवे, भानुदास राऊत,कोटीराम ठाकरे, अशोक तलवेकर,अरुण चौधरी, वसंता कामडी, विठल डांगे, ईश्वर मुळे, ईश्वर धरत, गजानन चावरे, मधुकर बागुलकर, निलकंठ काटेखाये, मनोहर कामडी, श्रीनिवास बनसोड, इत्यादी बांधव उपस्थित होते,