Chandrapur Lok Sabha Congress Candidate : चंद्रपूर लोकसभा जागेवर कांग्रेस पक्षातून आता यांचा दावा

Chandrapur Lok Sabha Congress Candidate – देशात कांग्रेस पक्षाला कुणीही हरवू शकत नाही, कारण कांग्रेसला फक्त कांग्रेसच हरवू शकते, असंच काही चंद्रपूर लोकसभेत घडताना दिसत आहे.

 

खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनांनंतर लोकसभा क्षेत्र मागील वर्षभरापासून खासदार विना आहे, वर्ष 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे, मात्र त्याआधी या जागेवर कांग्रेस पक्षातून दावेदारी करणारे नाव पुढे येत आहे.

 

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुक (Chandrapur Lok Sabha Congress Candidate) लढण्याची तयारी दर्शवित जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात सुद्धा केली आहे, काही दिवसांनी विरोधीपक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यास आपली तयारी दर्शविली. वडिलांच्या इच्छेनंतर आता त्यांच्या कन्येने चंद्रपूर लोकसभेवर दावा केलाय.

 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे चंद्रपूर लोकसभेचे तिकीट मागितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तिकिटासाठी येत्या काळात मोठी चुरस बघायला मिळणार आहे.चंद्रपूर लोकसभा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, मागील काही निवडणुकीत भाजपने आपली पकड या क्षेत्रावर घट्ट केली होती. भाजपचे हंसराज अहिर या क्षेत्रातून तब्बल तीनवेळा विजयी झाले होते. मात्र, २०१९ मध्ये राज्यात मोदी लाट असताना शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता. Chandrapur Lok Sabha Congress Candidate

 

या विजयात ओबीसी समाजाची गठ्ठा मते धानोरकर यांच्या पारड्यात पडली होती मात्र, बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

 

सोबत विजय वडेट्टीवार यांनीही पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढू, असे म्हटले आहे. अशात शिवानी वडेट्टीवार यांनी आता पक्षाकडे तिकीट मागितल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर काँग्रेसच्या वतीने आणि विजय क्रांती संघटनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकसभेच्या तिकीटा वरुन कांग्रेसमधे मोठी चुरस निर्मान झाली आहे. एकंदरीत, काँग्रेस पक्षश्रेष्ठी तिकीट नेमकी कुणाला देतात, हे येणाऱ्या काळातच कळणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!