Thursday, April 25, 2024
Homeताज्या बातम्याHansraj Ahir in BJP list : मंत्र्यांच्या यादीत हंसराज अहिर यांचे नाव

Hansraj Ahir in BJP list : मंत्र्यांच्या यादीत हंसराज अहिर यांचे नाव

- Advertisement -
- Advertisement -

Hansraj Ahir in BJP list प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) व सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकरीता शिक्षणाच्या प्रभावी सुविधा, शिष्यवृत्ती तसेच सिमांत वर्गाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सशक्तीकरण व अल्प व्याजदरात कर्जाद्वारे आर्थिक सहाय्यता आदी प्रयोजनार्थ समाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी स्तरावर राबविण्यात येत असलेल्या पीएम-सुरज (प्रधानमंत्री-सामाजिक उत्थान व रोजगार आधारीत जनकल्याण) या महत्वाकांक्षी योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून या योजनेच्या शुभारंभास समनवयक व सन्माननिय अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (कॅबीनेट दर्जा) यांचेवर दायीत्व सोपविण्यात आले आहे.

 

वाचा – चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी भैया तयार

दि. १३ मार्च २०२४ रोजी सायं. ०४ वा आयोजित PM-SURAJ या देशव्यापी पोर्टल शुभारंभाचा कार्यक्रम मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. Hansraj Ahir in BJP list

 

देशभरातील ५२५ जिल्ह्यात ही सामाजिक सशक्तीकरण योजना राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्यातील ९ जिल्ह्यांचा या योजनेत प्रारंभिक स्तरावर समावेश करण्यात आले असून या जिल्ह्यांसाठी समन्वयक म्हणुन केंद्रीय कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. Hansraj Ahir in BJP list

 

वाचा – चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला धोका

मुंबईकरीता केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नागपूर जिल्हा- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सिंधुदूर्ग-केंद्रीय मंत्री नारायण राणे, नाशीक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीबेन पवार, धुळे-केंद्रीय राजमंत्री भागवत कराड, सोलापूर-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अहमदनगर-केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हिंगोली- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!