Big political upheaval in Chandrapur चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आजपासून थंडावल्या असून पुढील मतदानापूर्वीचे दोन दिवस गुप्त प्रचार सुरू होणार, मात्र त्यापूर्वी चंद्रपुरातील राजकीय क्षेत्रात मोठी घडामोड बघायला मिळाली.
17 एप्रिलला चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडचा भव्य मेळावा घेत महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दिला.
चंद्रपूरच्या राजकारणात जोरगेवार व मुनगंटीवार एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. Big political upheaval in Chandrapur
पूर्वी किशोर जोरगेवार हे भाजप पक्षात सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काम करायचे, मात्र वर्ष 2014 च्या निवडणूक दरम्यान जोरगेवार यांना विधानसभेची तिकीट न मिळाल्याने जोरगेवार शिवसेनेत दाखल झाले, त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र 2019 ला शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेड नामक संघटना स्थापन करीत अपक्ष निवडणूक लढवली, या निवडणुकीत जोरगेवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. Big political upheaval in Chandrapur
त्यानंतर मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा सामना चंद्रपुरात रंगला, शहरातील अनेक कार्यक्रमात भर मंचावर दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू केले होते.
महाविकास आघाडी सरकारला अपक्ष आमदार जोरगेवार यांनी पाठिंबा दिला, त्यानंतर राज्यात महायुती सरकारला सुद्धा जोरगेवार यांनी पाठिंबा दिला, मात्र लोकसभा निवडणुकीत उभे असलेले महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार राजकीय विरोधक त्यांना पाठिंबा द्यायचा तरी कसा? असा यक्ष प्रश्न अपक्ष आमदार जोरगेवार यांच्यापुढे उभा राहिला मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी केल्यावर अखेर जोरगेवार यांना मनोमिलन करावे लागले. Big political upheaval in Chandrapur
आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात किशोर जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार हे माझे राजकीय गुरू आहे, आज आम्ही एकत्र आले असून मी त्यांना गुरुदक्षिणा देत आहोत.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की अपक्ष आमदारांच्या समर्थनाने मला ताकद मिळाली आहे, याचा फायदा लोकसभा सहित चंद्रपूर विधानसभेत होणार.