The Burning Truck : चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर थरार

The Burning Truck  कोरपना – यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना हायवाच्या टायरने पेट घेतल्याने हायवाला भीषण आग लागली. ही घटना राजुरा – कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील, कोरपना तालुक्यातील आसन खुर्द जवळ सोमवार दिनांक २२एप्रिल ला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. The Burning Truck

ही बातमी अवश्य वाचा – मोफत शिक्षणाचा अधिकार हिरावला, बदलले नियम

 

सद्यस्थितीत राजुरा – कोरपना – राज्य सीमा राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक ३५३ बी चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी महामार्ग निर्मितीचे काम असलेल्या जीआर कंपनी द्वारे मोहदा येथून गिटी आणली जात आहे. तिथून येत असताना अचानक हायवा क्रमांक एच आर ५८ सी ६२४० च्या मागील टायरने पेट घेतला.

प्रवाश्यानो ही बातमी वाचा – चंद्रपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

याबाबत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी ड्रायव्हरला कल्पना असता वाहनचालक तात्काळ उतरला. त्यामुळे तो ही सुदैवाने बचावला.
मात्र कुठलेही अग्निशामक साहित्य नसल्याने त्याचाही नाईलाज झाला. The Burning Truck

अवश्य वाचा – ईको प्रो संस्थेची बदनामी

मार्गाच्या कामाला असलेल्या पाणी टँकरमधून पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास नंतर गडचांदूर नगर पालिका व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अग्निशमन वाहन पोहोचले. त्यामुळे आग आटोक्यात आली. The burning truck

या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर घटना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. घटनेचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.ओव्हरलोडमुळे टायरने पेट घेतल्याचे बोलले जात आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!