Municipal Commissioner Facebook account चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपीन पालिवाल यांचे फेसबुक समाजमाध्यमावरील खाते हॅक (क्लोन) झाले आहे, त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील अनेकांना पैश्याची मागणी करण्यात आली आहे.
22 एप्रिलला विपीन पालिवाल यांनी फ्रेंड लिस्ट मधील सर्वांना आवाहन केले की माझ्या नावावर फेसबुक द्वारे पैश्याची मागणी केल्यास आपण त्याला प्रतिसाद देऊ नये. आपण तात्काळ ते खाते ब्लॉक करावे. Municipal Commissioner Facebook account
समाजमाध्यमावरील जगात सर्वात जास्त वापरण्यात येणारे माध्यम म्हणजे फेसबुक याद्वारे अनेक जण आपले विचार व्यक्त करीत असतात मात्र काही महिन्यांपासून फेसबुक खाते क्लोन करीत फ्रेंड लिस्ट मधील व्यक्तींना पैश्याची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहे. Municipal Commissioner Facebook account
ही बातमी वाचा : RTE मोफत शिक्षणाचा कायदा, महायुती सरकारने हिरावला
विशेष म्हणजे काहीजण आर्थिक बळी सुद्धा पडलेले आहे, चंद्रपूर मनपा आयुक्त पालिवाल यांनी वेळेपूर्वी सर्वांना आवाहन केल्याने आता तो धोका टळला मात्र नागरिकांनी आता खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिवाल यांनी केले आहे. Municipal Commissioner Facebook account
ही बातमी वाचा : चंद्रपुरातील राष्ट्रीय महामार्गावर आगीचे तांडव
पालिवाल यांच्या फेसबुक खात्यावरून नागरिकांना मॅसेज गेले की माझ्या घरातील फर्निचर विकायचे आहे आपला मोबाईल क्रमांक द्या मी आपल्याला माहिती देतो, त्यानंतर आपण कॉल द्वारे पुढील व्यवहार करू.