Unseasonal rain in Chandrapur चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेमध्ये मराठवाडा भागातून मोठ्या संख्येत येणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयी सुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे आज अचानक झालेल्या तुफानी बरसातीने प्रशासनाच्या व्यवस्थेचे पोल खुलल्याचे चित्र दिसले.
हे ही वाचा – Right to Education कायद्याचा महायुती सरकारने केला बट्ट्याबोळ
अनेक ठिकाणी यात्रेकरूंना शौचालयाची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, राहण्याची, स्वयंपाक करण्याची व्यवस्था कुठेही नसल्याने यात्रेकरूंच्या समोर खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले पाहायला मिळाले. Unseasonal rain in Chandrapur
ही बातमी अवश्य वाचा – चंद्रपुरात टायरने ट्रक पेटविला
या जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असून मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी मिळतो तथा येथील राजकीय भौगोलिक स्थिती बघता अनेकदा या जिल्ह्यातील नेत्यांनी मंत्रीपद भूषवलेले आहेत तरी देखील सुधारणा होत नसल्याने चंद्रपूरच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. Unseasonal rain in Chandrapur
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधारी आणि विपक्ष कामाच्या बाता मारत फिरत होते. मात्र आता जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र जिल्हात दिसत आहे. त्यामुळे सर्वसाधारण आम आदमी स्वतः ची फसवणूक झाल्यासारखा वाटून घेत असून तात्काळ यात्रेकरूंची सोय करण्याकरिता उपाय योजना करव्यात अन्यथा आम आदमी पार्टी प्रशासनाचा विरोधात रस्त्यावर उतरेल असे आम आदमी पार्टी चे युवा जिल्हाद्यक्ष राजू कुडे यांनी म्हटले आहे. Unseasonal rain in Chandrapur
आंध्रप्रदेश, मराठवाडा, तेलंगणा राज्यातील नागरिक महाकाली मातेच्या दर्शनाकरिता चंद्रपुरात दाखल होतात, रखरखत्या उन्हात लाखो नागरिक आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन येतात, मात्र स्थानिक प्रशासनद्वारे त्यांची याठिकाणी अव्यवस्था होते.
अवकाळी पावसाने आज यात्रेकरूंचे पेंडाल उडाले, आई आपल्या बाळाला पावसापासून वाचविण्यासाठी धावपळ करताना दिसली, नागरिक चिखलात आपली वाट काढताना दिसले, आता रात्र निवारा कुठे करणार असा यक्ष प्रश्न नागरिकांसमोर उभा होता.