Chandrapur shivsena शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पक्ष प्रवेशाचा धडाका लावला, काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक सागर राऊत यांनी संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला.
22 एप्रिलला नागपूर येथे कांग्रेस नगरसेवक अमित पाझारे व बल्लारपूर विधानसभेचे उमेदवार व बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक सरफराज शेख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. Chandrapur shivsena
शिक्षणाची बातमी – RIGHT to Education मोफत शिक्षणाचा अधिकार बदलला
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाची वाटचाल मोठ्या धडाक्यात सुरू आहे, संदीप गिर्हे यांनी जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, ज्याप्रकारे पक्षात मोठे नेते व कार्यकर्ते प्रवेश घेत आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद सतत वाढत आहे. Chandrapur shivsena
यापूर्वी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संदीप गिर्हे यांनी तालुका निहाय जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केले, त्याठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, सोबतच अनेक पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम झाले, अनेक वर्षांनी शिवसेनेला संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात चांगलं प्रतिनिधित्व मिळाले आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना किंग मेकर ठरेल हे नक्की.