गुरू गुरनुले
Hanuman Jayanti 2024 मुल- मुल बसस्थानक येथे श्री. रामभक्त हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जि.प. अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी आपल्या मातोश्री कमलादेवी चंदनसिंह रावत यांचे स्मृतीप्रित्यर्थ बस स्थानकावर अनेक वर्षापूर्वी हनुमान मंदिराची स्थापना केली.
तेव्हा पासूनच दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटामाटात साजरा केल्या जात असून भाविकांचे एक जागृत श्रद्धास्थान बनले आहे. Hanuman Jayanti 2024
मुल बसस्थानकावर मुल, सिंदेवाही, पोभूर्णा, सावली, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी, चामोर्शी, गोंडपीपरी जाणारे येणारे हजारो भाविक श्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेत आहेत. आज हनुमान जयंती निमित्त सकाळी ७.०० वाजता मंदिर समिती प्रमुख रुपलसिंह रावत यांचे शुभ हस्ते व संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत मिश्रा महाराज यांचे मंत्रोपचारने मूर्ती पूजन महा अभिषेक करण्यात आले. सकाळी ८ वाजता दहेगाव मानकापूर येथील किशोर पेंदाम व त्यांचे मंडळ आकाशवाणी पुरस्कृत प्रसिद्ध भजन मंडळ यांच्या भक्त संगीताचा व काल्याचा कार्यक्रम करण्यात आला. Hanuman Jayanti 2024
सकाळ पासूनच श्री.रामभक्त हनुमान यांच्या दर्शनासाठी मुल शहरातील शेकडो भक्तजन व येणारे जाणारे हजारो प्रवाशी यांनीही हनुमानाचे दर्शन घेतले. दुपारी ११.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
महाप्रसादाचे दाते संतोष सिंह रावत यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप हाती घेतले त्यांच्या हाताला हातभार लावण्याचे सहकार्य, रूपल रावत, मोना रावत ,दीपक रावत, सभापती राकेश रत्नावार , प्रतीक मुरकुटे, नंदू कागदेलवार , कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, चतुर मोहुरले, प्रवीण चेपूरवार, चित्तरंजन वाढई, राजू चीलके, नवाब पठान संचालक घनश्याम येनुरकर, मंदिराचे पुजारी महाराज केशव गुज्जनवार, समितीचे लोमेश नागपुरे, सुनील मंगर, किशोर गुज्जनवार, छोटू रावत, संजय टिकले, सुमितसिंह बिष्ट, राजू गावतूरे, तेजस महाडोळे, अंकुश ध्यांनबोइंवार, चेतन कावळे, कमलेश रामटेके, अजय झाडे, सोमा नागपुरे, पंकज लाडवे, निखिल पांडव, यांचेसह हनुमान मंदिर समितीचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते यांनीही ५००० हजार भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात सहकार्य केले. Hanuman Jayanti 2024
हनुमान जयंती उत्सव दिना निमित्त आलेल्या समस्त भाविकांना व जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना महाप्रसादाचे वाटप केल्याने आयोजकांप्रती भक्तजनानी आभार व्यक्त केले आहे.