Letter from student to CM : तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक आम्हाला आवडले नाही

Letter from student to CM चंद्रपूर –  महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि अति मागास असलेल्या जीवती तालुक्यातील एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची चर्चा सध्या राज्यभर झाली होती. तुम्ही दिलेले पाठय़पुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार पुस्तके शोधाव लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तकच छान होते. कारण सगळे गणित एका पुस्तकात, सगळे इंग्रजी एका पुस्तकात, सगळे विज्ञान एका पुस्तकात होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तक वाचायला मजा यायची,’ असे तिने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

राजकीय बातमी अवश्य वाचा – 2 नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन

सोबतच अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचे काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. विद्यार्थिनीने लिहिलेले हे पत्र समाजमाध्यमात वायरल झाले होते.या मुलीचा सत्कार समाजसेवक भूषण फुसे यांनी केला. Letter from student to CM

 

शैक्षणिक साहित्य त्यांनी भेट दिलेत.राजकारणात आपल्या कर्तुत्वाने फुसे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. गरजवंतासाठी ते नेहमी धावून जातात. आंदोलनाच्या माध्यमातून जिवती तालुक्यातील अनेक समस्या त्यांनी सोडविल्या आहेत. थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न करणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थिनी दाखवलेल्या हिमतीचे फुसे यांनी कौतुक केले.

 

महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर जिवती तालुका वसलेला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या हा तालुका आजही मागासलेला आहे. येथील अनेक गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कायमचेच या तालुकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. मागास असलेल्या या तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीची चर्चा सध्या राज्यभर झाली होती. Letter from student to CM

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!