Water problem in Chandrapur : चंद्रपूर शहरातील एक दिवसआडचा विकास

Water problem in Chandrapur चंद्रपूर मनपा हद्दीत मोठ्या थाटामाटात अमृत योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता मात्र अमृत आता नागरिकांच्या जिव्हारी लागत आहे, अमृत योजनेचा पहिला टप्पा अपूर्ण सुरू झाला आता दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून मागील अनेक वर्षांपासून 1 दिवस आड नळाला पाणी येत आहे.

 

घुटकाला प्रभागात मागील 2 ते 3 दिवसापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिक पाण्याच्या टाकीजवळ पोहचले, लिकेज प्रॉब्लेम असल्यामुळे नळ येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले, मात्र हा लिकेज चा त्रास आमच्या प्रभागात वारंवार का होत आहे? असा प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केला. Water problem in Chandrapur

पाणी 6 महिने देता आणि वर्षभराचे बिल वसूल करता हा कुठला न्याय आहे, भर उन्हाळ्यात पालिकेतर्फे पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम मनपा करीत आहे, 42 डिग्री तापमानात नागरिक पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहे, विकासाच्या नावाने शहरात अधोगती आली की काय असे चित्र या माध्यमातून पुढे येत आहे. यामुळे नागरिकांचा संयम आता सुटताना दिसत आहे, मनपाने पाण्याच्या समस्येवर तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाणार असा इशारा नागरिकांनी दिला आहे. Water problem in Chandrapur

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!