Chandrapur police bharti : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आमिष दिले तर कारवाई अटळ – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

Chandrapur police bharti चंद्रपूर पोलीस दलातील 137 पोलीस शिपाई व 9 बॅण्ड मॅन च्या पदासाठी 19 जून पासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणी ची प्रक्रिया सुरु होणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ममुमक्का सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

महत्त्वाचे : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये

विशेष बाब म्हणजे यंदा पोलीस भरतीची प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.
137 पोलीस शिपाई पदाकरिता तब्बल 22 हजार 583 अर्ज प्राप्त झाले आहे, त्यामध्ये पुरुष उमेदवारांचे 13 हजार 443 अर्ज, महिला उमेदवारांचे 6 हजार 315 अर्ज तर 2 तृतीयपंथीयांचे अर्ज प्राप्त झाले आहे. तर 9 बँड्समॅन च्या पदासाठी 2 हजार 176 पुरुष उमेदवारांचे अर्ज, 646 महिला उमेदवार तर 1 तृतीयपंथी उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला आहे.

अवश्य वाचा : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

Chandrapur police bharti पावसाची शक्यता बघता उमेदवारांची शारीरिक चाचणी जिल्हा क्रीडा संकुलात होणार असून त्याठिकाणी उमेदवाराने हजर व्हायच्या आधी उंची व छातीचे मोजमाप करीत त्यांचे कागदपत्रे तपासल्यांनंतर त्यांना आत प्रवेश दिल्या जाणार आहे.

त्यांनतर शारीरिक चाचणीमध्ये पुरुषाच्या 100, 1600 मीटर व महिलांची 100, 800 मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक वर उमेदवारांना स्पोर्ट शूज वापरण्यास मुभा देण्यात येईल.

अवश्य वाचा : 12 वी पास झाला तर हे अभ्यासक्रम निवडा, आणि मिळवा लाखोंचे पॅकेज

Chandrapur police bharti सदर पोलीस भरती प्रक्रिया हि पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी RFID पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
सदर भरती प्रक्रिया हि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार असून उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडत स्वतः गुणवत्ता सिद्ध करीत या भरती प्रक्रियेत सहभाग घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रियेत उमेदवाराने उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही याचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेतल्या जाणार आहे, जर या आदेशाचे पालन न केल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

 

Chandrapur police bharti 19 जून ला सुरु होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी काही उमेदवार 1 किंवा 2 दिवसापूर्वी दाखल होतात, यंदा उमेदवार उघड्यावर कुठेही राहू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांनी त्यांची व्यवस्था पोलीस मुख्यालय येथील ड्रिल शेड मध्ये केली आहे.

बाहेरील किंवा इतर कर्मचारी उमेदवारांना पोलीस दलात लावून देत असल्याचे आमिष देत असेल तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.
महिनाभर चालणाऱ्या या भरती प्रक्रियेदरम्यान पावसामुळे व्यत्यय आल्यास उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख कळविण्यात येईल.
आयोजित पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपस्थित होत्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!